Summer Fashion : रंग माझा वेगळा! उन्हाळ्यात पांढरा रंग दिसेल खुलून, तुम्हालाही स्टायलिश दिसायचंय, तर तुम्ही 'या' हटके साड्या घालू शकता
Summer Fashion : जर तुम्हाला पांढऱ्या रंगाची साडी घालायची असेल, तर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या या लेटेस्ट डिझाइनच्या साड्या निवडू शकता.
Summer Fashion : पांढरा रंग हा शांततेचा प्रतीक आहे. उन्हाळ्यात पांढरा रंग हा सर्वात जास्त महिला परिधान करतात. अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांना पांढरा रंग खूप आवडतो, उन्हाळ्यात कोणत्या रंगाचे पोशाख घालायचे असा प्रश्न सर्वांना पडतो. पण यासाठी पर्याय पांढरा रंग आहे ना..! या रंगाचे पोशाख घातल्याने गरमही होत नाही, आणि उन्हाळ्यात खलून दिसतात. विशेष प्रसंगी अनेकांना पांढऱ्या रंगाचे पोशाख घालणे आवडते. परंतु कधीकधी ते पांढऱ्या रंगाच्या पोशाखांबाबत नेमकं काय घालायचं याबाबत खूप गोंधळून जातात. अशा वेळी या हटके साड्यांचं डिझाईन एकदा पाहाच आणि स्टाईल करा...
खास प्रसंगी नेसा पांढरी साडी
पांढऱ्या रंगाचा पोशाख दिसायला सुंदर आणि रॉयल वाटतो. जर तुम्हाला एखाद्या खास प्रसंगी पांढरा पोशाख घालायचा असेल, तर तुम्ही या लेखात नमूद केलेली पांढऱ्या रंगाची साडी निवडू शकता. या लेखात, आम्ही तुम्हाला साड्यांच्या काही डिझाईन्स दाखवणार आहोत ज्या अनेक खास प्रसंगी घालण्यासाठी योग्य पर्याय असू शकतात.
नेट साडी
या प्रकारची पांढरी नेट साडी हा एक योग्य पर्याय ठरू शकतो. या पांढऱ्या रंगाच्या साडीवर सॅटिन ब्लाउजसोबत एम्ब्रॉयडरी आहे. अशा प्रकारची साडी अनेक कार्यक्रमांमध्ये नेसता येते. त्याच वेळी, जर तुम्ही दिवसभरात कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होत असाल, तरीही तुम्ही या प्रकारची साडी नेसू शकता. तुम्हाला या साड्या बाजारात आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर स्वस्त दरात मिळतील.
बनारसी साडी
महिलांना बनारसी साडी खूप आवडते. जर तुम्ही पांढऱ्या रंगात बनारसी साडी शोधत असाल तर तुम्ही या प्रकारची ऑफ व्हाइट कलर गोल्डन व्हाईट साडी घालू शकता. या प्रकारची साडी अनेक प्रसंगी नेसता येते. या प्रकारच्या साडीत तुम्ही सुंदर दिसताच, पण या साडीत तुमचा लूकही रॉयल दिसेल. तुम्हाला या साड्या अनेक डिझाईन्समध्ये मिळतील आणि तुम्ही या प्रकारची साडी ऑनलाइन देखील खरेदी करू शकता.
सिल्क साडी
तुम्हाला आकर्षक दिसायचे असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगात अशा प्रकारच्या सिल्क साडीची निवड करू शकता. ही साडी एम्ब्रॉयडरी केलेली असून तिची बॉर्डर डिझाइन केलेली आहे. या प्रकारची साडी हा पार्टीत घालण्यासाठी योग्य पर्याय असू शकतो, या प्रकारच्या साडीसोबत तुम्ही हील्स घालू शकता आणि चांदीच्या रंगाचे दागिने देखील घालू शकता. तुम्हाला या साड्या बाजारात सहज मिळतील ज्या तुम्ही स्वस्त दरात खरेदी करू शकता आणि ऑनलाईन देखील तुम्हाला अशा अनेक डिझाइन्समध्ये साड्या मिळतील.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Gudi Padwa 2024 : गुढीपाडवा खास, साडी भारी! सिल्क साड्यांच्या 'या' डिझाईन्स पाहिल्या? अभिनेत्री प्रमाणे दिसाल...