Skin Care Tips : तुमच्या 'या' चुकांमुळे चेहरा काळवंडतो; चमकदार आणि नितळ त्वचेसाठी फॉलो करा 'हे' उपाय
Skin Care Tips : खाण्यापिण्याच्या सवयींपासून ते व्यायामापर्यंत, तुमच्या सर्व दैनंदिन कामाचा तुमच्या आरोग्यावर तसेच त्वचेवर परिणाम होतो.
Skin Care Tips : प्रत्येकाला चमकणारी आणि ग्लोईंग त्वचा हवी असते. पण, काही वेळा आपल्या त्वचेच्या समस्या वाढू लागतात आणि अचानक त्वचेचा रंग बदलतो. चेहरा निस्तेज दिसतो. यामागे फक्त प्रदूषणच नाही तर इतरह अनेक कारणे आहेत ज्याचा आपल्य चेहऱ्यावर परिणाम होतो. तुमच्या त्वचेची चमक किंवा निस्तेजता तुम्ही कोणत्या प्रकारचं स्किन केअर (Skin Care Tips) रूटीन फॉलो करत आहात यावर अवलंबून असते. दैनंदिन जीवनात केलेल्या काही चुकांमुळे त्वचेचा रंग गडद होऊ लागतो आणि चेहरा निर्जीव दिसू लागतो.
खाण्यापिण्याच्या सवयींपासून ते व्यायामापर्यंत, तुमच्या सर्व दैनंदिन कामाचा तुमच्या आरोग्यावर तसेच त्वचेवर परिणाम होतो. चेहरा फ्रेश आणि ग्लोईंग ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. तुमच्या अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे चेहरा काळवंडतो याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचा जास्त वापर करणे
कॉस्मेटिक प्रोडक्ट्समध्ये अनेक प्रकारच्या केमिकल्सचा वापर केला जातो. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन कामात हेव्ही मेकअप करत असाल किंवा तुमचा मेकअप चांगल्या दर्जाचा नसेल तर त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला नुकसान पोहोचू शकते. यााच परिणाम नंतर पिगमेंटेशन, त्वचा काळवंडणे, चेहऱ्यावर डाग दिसणे यात होतो. लिपस्टिक वापरतानाह जर तुम्ही चांगल्या दर्जाची वापरली नाही तर तुमचे ओठ काळे पडतात.
सनस्क्रीनचा वापर न करणे
थंडीच्या दिवसांत अनेकजण शरीराला ऊबदार ठेवण्यासाठी जास्त वेळ उन्हात राहतात. यामुळे तुमची त्वचा काळी पडते. तसेच, जर तुम्ही सनस्क्रिनचा वापर केला नाही तर त्याचा त्वचेवर आणखी परिणाम होतो. त्यामुळे उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे.
गरम पाण्याने अंघोळ करणे
हिवाळ्यात बहुतेकांना गरम पाण्याने अंघोळ करायला आवडते. याचे फायदेसुद्धा आहेत आणि तोटे देखील आहेत. जास्त वेळ गरम पाण्याने अंघोळ केल्याने तुमच्या त्वचेतील कोरडेपणाची समस्या वाढू शकते आणि त्यामुळे त्वचेचा रंग निखळू लागतो. त्यामुळे अंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करा.
पाणी न पिणे
पुरेसे पाणी न प्यायल्याने त्वचा डिहायड्रेट होते आणि यामुळे तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे तुमची त्वचा काळवंडते. आणि चेहरा निर्जीव दिसू लागतो. म्हणूनच, जर तुम्हाला तुमची त्वचा आणि संपूर्ण शरीर निरोगी ठेवायचं असेल तर भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे.
अनहेल्दी आहाराचं सेवन
बिघडलेल्या जीवनशैलीमुळे खाण्याच्या सवयी खूप बिघडत चालल्या आहेत. अनहेल्दी पदार्थांच्या सेवनाने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम तर होतोच पण पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे तुमच्या त्वचेचा रंगही गडद होऊ शकतो. त्वचेचा ग्लो जर टिकवायचा असेल तर आहारात हिरव्या पालेभाज्या, फळं आणि ड्रायफ्रूट्सचा समावेश करा.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.