Skin Care Tips : उन्हाळ्यात त्वचेची घ्या अशी काळजी; फॉलो करा सोप्या टिप्स
Skin Care Tips : उन्हाळ्यामध्ये त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते.
![Skin Care Tips : उन्हाळ्यात त्वचेची घ्या अशी काळजी; फॉलो करा सोप्या टिप्स skin care tips summer skin care extra care in summer season follow this tips Skin Care Tips : उन्हाळ्यात त्वचेची घ्या अशी काळजी; फॉलो करा सोप्या टिप्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/09/5f8e6606c56143388ae47dbda052661b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Skin Care Tips : हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडणे तसेच अनेक इतर समस्या जाणवतात. पण आता ऋतू बदलत आहे. उन्हाळ्याला सुरूवात होत आहे. उन्हाळ्यामध्ये देखील त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हामुळे त्वचा काळी पडणे, रॅश येणे इत्यादी समस्या तुम्हाला जाणवतील. त्वचेची काळजी घेण्यासाठी या सोप्या टिप्स तुम्ही उन्हाळ्यामध्ये फॉलो करू शकता.
1. उन्हाळ्यामध्ये सनस्क्रिनचा वापर करावा. सनस्क्रीन लावल्यानंतर टॅनिंग होत नाही.
2.चेहरा थंड पाण्याने धुवा-
उन्हाळ्यामध्ये सतत घाम येत असतो. त्यामुळे हा घाम जर तसाच राहिला तर त्वचेवर रॅश येऊ शकते. त्यामुळे चेहरा दिवसातू तीन वेळा थंड पाण्याने धुवावा.
3.हायड्रेटिंग फेस क्रीम-
उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी हायड्रेटिंग क्रिमचा वापर करा. तसेच मॉयस्चरायजर क्रिम, क्लिंजिंग क्रिम आणि हायड्रेटिंग फेसमास्कचा वापर करा. विटॅमिन सी सिरमचा वापर देखील तुम्ही करू शकता. तसेच कोरफड जेल आणि चंदचा पॅक आणि गुलाब पाणी इत्यादी गोष्टी चेहऱ्याला लावल्यानं तुमची त्वचा मुलायम आणि तजेलदार होईल.
4. योग्य प्रमाणात पाणी प्या-
उन्हाळ्यात पाणी भरपूर प्यायल्यानं त्वचा तजेलदार होते. तसेच पचन क्रिया चांगल्या पद्धतीनं होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : 'हा' आजार असलेल्यांनी चुकूनही करू नये शेंगदाण्यांचे सेवन; आरोग्यासाठी ठरेल हानिकारक
- No Smoking Day 2022 : धूम्रपान दिनाचा इतिहास आणि महत्त्व नेमकं काय? जाणून घ्या...
- Amla benefits : सुपरफूड अशा आवळ्याचे 'हे' गुणधर्म आणि वापरण्याची पद्धत तुम्हाला माहित आहे का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)