(Source: ECI/ABP News/ABP Majha)
No Smoking Day 2022 : धूम्रपान दिनाचा इतिहास आणि महत्त्व नेमकं काय? जाणून घ्या...
No Smoking Day 2022 : व्यसनाधिन धूम्रपान करणाऱ्या लोकांना कायमचे धूम्रपान सोडण्यास मदत करण्याच्या उद्देशाने या दिवसाची सुरुवात करण्यात आली.
No Smoking Day 2022 : धूम्रपानाद्वारे तंबाखूच्या हानिकारक आरोग्यावरील परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि जगभरातील लोकांना धूम्रपान (Smoking) सोडण्यास प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी मार्चच्या दुसऱ्या बुधवारी धूम्रपान निषेध दिन (No Smoking Day) साजरा केला जातो. सिगारेट, विडी आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्याने माणसाच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. हा दिवस 'नो टोबॅको डे' (No Tobacco Day) पासून प्रेरित आहे आणि युनायटेड किंगडममध्ये हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
धूम्रपान निषेध दिनाचा इतिहास ( No Smoking Day History) :
युनायटेड किंगडमध्ये 1984 मध्ये हा दिवस प्रथमच साजरा करण्यात आला. यापूर्वी, हा दिवस मार्चच्या पहिल्या बुधवारी साजरा केला जात असे. मात्र, कालांतराने हा दिवस महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी साजरा केला जाऊ लागला. व्यसनाधीन धूम्रपान करणाऱ्यांना धूम्रपान कायमचे सोडण्यास मदत व्हावी या उद्देशाने या दिवसाची सुरुवात करण्यात आली. हा आरोग्य जागरूकता दिवस आहे जो दरवर्षी वेगळ्या थीमसह साजरा केला जातो. यावर्षीची थीम आहे, 'धूम्रपान सोडणे तणावपूर्ण असण्याची गरज नाही' (quitting smoking doesn’t have to be stressful) अशी थीम आहे.
धूम्रपान निषेध दिनाचे महत्व (No Smoking Day Importance) :
लोकांना धुम्रपानाच्या दुष्परिणामांबद्दल जागरुक करण्यासाठी आणि वेळेवर ते सोडण्यास मदत करण्यासाठी या दिवसाची सुरुवात करण्यात आली. धूम्रपान सोडण्यासाठी खूप समर्पण आणि प्रेरणा लागते. कारण जे नियमितपणे धूम्रपान करतात, त्यांच्या शरीराला त्याचे व्यसन लागते. त्यामुळे, ही घातक सवय सोडण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यासाठी प्रत्येकासाठी हा दिवस उत्तम संधी आहे.
महत्वाच्या बातम्या :
Important Days in March 2022 : मार्च महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha