कोरोनातून बरे झाल्यानंतर आता केस गळतीचा धोका? डॉक्टर म्हणाले...
दुसऱ्या लाटेनंतर अशा केस गळण्याची समस्या घेऊन येणाऱ्याची संख्या वाढली असल्याच डॉक्टरांचे म्हणणं आहे.
![कोरोनातून बरे झाल्यानंतर आता केस गळतीचा धोका? डॉक्टर म्हणाले... Risk of hair loss now after healing from corona? The doctor said ... कोरोनातून बरे झाल्यानंतर आता केस गळतीचा धोका? डॉक्टर म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/23/b80476af534db393e2486af345564986_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कोरोनाबधितांमध्ये कोरोना झाल्यानंतर डोक्यावरील केस गळण्याचं प्रमाण वाढलं असल्याच समोर येत आहे. केस गळण्याच्या समस्या कोरोना होऊन गेलेले अनेक जण डॉक्टरांकडे येत आहेत. त्यामुळे खरंच कोरोना हे केस गळण्याचं कारण आहे का ? का गळतायत ही केसं ? त्यावर नेमका उपाय काय?
कोरोना झाल्यानंतर तुमचे केस गळण्याचं प्रमाण वाढलाय? कारण जानेवारी 2021 मध्ये लँसेंटमध्ये पब्लिश झालेल्या संशोधनातून कोव्हिड झालेल्या टक्के लोकांमध्ये केस गळण्याची समस्या निदर्शनास आली आहे. खास करून दुसऱ्या लाटेनंतर अशा केस गळण्याची समस्या घेऊन येणाऱ्याची संख्या वाढली असल्याच डॉक्टरांचे म्हणणं आहे.
कोरोनानंतर केस गळण्याची नेमकी कारण काय आहेत?
कोरोना लक्षणांनी फक्त शारीरिक नाही तर मानसिकरीत्याही नुकसान पोहोचवलं आहे. यामुळे लोकांना केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे कोरोना सारखा आजार झाल्यावर शरीराच्या अंतर्गत भागात सूज येते आणि त्यामुळे टेलोजेन एफ्लुवियम ज्या स्टेजला TE म्हटलं जातं या स्टेजमध्ये डोक्यावरील केस गळण्याचं प्रमाण वाढत.
हे केस कोरोनानंतर गळण्याचे प्रमाण जरी वाढलं असलं तरी गळालेले केस कायमचे गळून न जाता हे केस पुन्हा एकदा तीन ते चार महिन्यांनी वाढायला सुरुवात होते. ही समस्या उद्भवू नये यासाठी योग्य आहारासोबत व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स बायोटिन , व्हिटॅमिन डी 3 सप्लिमेंट्स , हाय प्रोटिन डायटच्या सेवनाने कमतरता भरून काढणे आणि टेन्शन फ्री लाईफ जगणे जगणे हा ऐकमेव उपाय आहे.
त्यामुळे कोरोनानंतर जर तुम्हाला केस गळण्याची समस्या जाणवत असेल, तर काळजी करण्याचा अजिबात गरज नाही. तेच केस पुन्हा एकदा तुमच्या डोक्यावर वाढतील. योग्य प्रमाणात आहार त्यासोबत व्हीटामिन ,प्रोटिन्स योग्य प्रमाणात सेवन आणि स्ट्रेस फ्री लाइफ जगणे महत्त्वाचा आहे. त्यानंतर सुद्धा तुम्हाला केस गळण्याची समस्या जाणवत असेल तर तुम्ही जवळच्या त्वचारोगतज्ज्ञकडे जाऊन यावर उपचार घेऊ शकता.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)