एक्स्प्लोर

Sharad Pawar and Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार

Devendra Fadnavis and Sharad Pawar: गेल्या काही दिवसांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमधील संबंध ताणले गेले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Devendra Fadnavis and Sharad Pawar: राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनकाळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी शरद पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाणार असल्याचे समजते. विधिमंडळातील नितीन देशमुख (Nitin Deshmukh Case) मारहाण प्रकरण आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा सभागृहात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे पावसाळी अधिवेशन प्रचंड गाजले होते. यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातच सर्वपक्षीय आमदारांना सुनावले होते. 'राज्यातील जनता आपल्याला शिव्या देत आहे. आमदार माजले आहेत', असे जनता बोलत असल्याचे खडेबोल देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले होते. या सगळ्या वादांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील वातावरण कलुषित झाले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या भेटीमुळे उभय नेत्यांमध्ये काय चर्चा होणार, याबद्दल राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागून राहिली आहे.

दरम्यान, शनिवारी सकाळी जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते असलेल्या नितीन देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेतली. नितीन देशमुख हे शरद पवारांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी नितीन देशमुख यांनी विधिमंडळाच्या लॉबीत घडलेल्या हाणामारीबाबत शरद पवार यांना माहिती दिली असण्याची शक्यता आहे. नितीन देशमुख यांना गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. विधिमंडळाच्या लॉबीत हा प्रकार घडल्याने महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला बट्टा लागला होता. यानंतर नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली होती. नितीन देशमुख यांना पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवून धरली होती. त्यानंतर बराच गदारोळ झाला होता. अखेर काही दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याला जामिनावर सोडण्यात आले होते. मात्र, या सगळ्या प्रकारामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील संबंध कधी नव्हे इतके कटू झाले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

आणखी वाचा

विधानभवन हाणामारी प्रकरण! नितीन देशमुख आणि सर्जेराव टकलेंना जामीन मंजूर,  25 हजारांच्या जात मूचलक्यावर सुटका

ज्याला वाचवण्यासाठी जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीसमोर झोपले तो नितीन हिंदुराव देशमुख कोण?

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
Shiv Nadar : दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
Parth Pawar : पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Thane : ठाण्यातील व्यापारी त्रस्त, आश्वासनं कधी पूर्ण होणार?
PCMC Politics: पिंपरी-चिंचवडमध्ये पवार काका-पुतणे एकत्र? भाजपला शह देणार
Ajit Pawar Meet Devendra Fadnavis: पुत्र पार्थ पवारांवरील आरोपांमुळे अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
Parth Pawar Land Deal: पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे परत जाण्याची शक्यता
Financial Fraud: मुलींना बरं करण्याचं आमिष, 14 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी 'तांत्रिक' जोडपे अटकेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
Shiv Nadar : दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
Parth Pawar : पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
Narendra Patil on Ajit Pawar and Chhagan Bhujbal: अजित पवारांचं टेन्शन आणखी वाढणार? छगन भुजबळांचं नाव घेत नरेंद्र पाटलांचा खळबळजनक आरोप
अजित पवारांचं टेन्शन आणखी वाढणार? छगन भुजबळांचं नाव घेत नरेंद्र पाटलांचा खळबळजनक आरोप
धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप
धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
Embed widget