Pitru Paksha 2023 : श्राद्धाच्या भोजनाचे ताट इतर दिवसांपेक्षा असते वेगळे, श्राद्धात जेवण देण्याची योग्य पद्धत, जाणून घ्या
Pitru Paksha 2023 : श्राद्धाचे भोजन इतर दिवसांपेक्षा वेगळे असते. ते शिजवण्याच्या आणि वाढण्याच्या पद्धतीतही फरक आहे. जाणून घ्या शास्त्रानुसार श्राद्धात भोजन देण्याची पद्धत काय आहे?
![Pitru Paksha 2023 : श्राद्धाच्या भोजनाचे ताट इतर दिवसांपेक्षा असते वेगळे, श्राद्धात जेवण देण्याची योग्य पद्धत, जाणून घ्या pitru paksha 2023 marathi news know correct rules and method of serving food in shradh Pitru Paksha 2023 : श्राद्धाच्या भोजनाचे ताट इतर दिवसांपेक्षा असते वेगळे, श्राद्धात जेवण देण्याची योग्य पद्धत, जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/08/26b18526bf97ed32fdfb52b63300c9ac1696738687310381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pitru Paksha 2023 : पितृ पक्ष किंवा श्राद्ध पक्ष 29 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे, जो 16 ऑक्टोबर 2023 रोजी संपेल. श्राद्ध पक्षामध्ये पिंडदान, तर्पण इत्यादी विधी पितरांसाठी केले जातात. तसेच श्राद्धाच्या वेळी अन्नदान करण्याची योग्य पद्धत काय आहे? जाणून घ्या
श्राद्धाचे भोजन इतर दिवसांपेक्षा वेगळे
असे मानले जाते की, श्राद्धाच्या वेळी अर्पण केलेले अन्न पितरांपर्यंत पोहोचते आणि त्यांचा आत्मा तृप्त होतो. मात्र श्राद्धाचे भोजन इतर दिवसांपेक्षा वेगळे असते. यामध्ये लसूण, कांदा, मसूर, मांसाहार वर्ज्य आहे.
श्राद्ध भोजन वाढण्यासाठी नियम आणि पद्धती
पाच ठिकाणी श्राद्ध भोजन काढले जाते. ब्राह्मणांनाही श्राद्ध भोजन दिले जाते. पण श्राद्धात केवळ अन्न शिजवण्यासाठीच नाही तर ते वाढण्यासाठी काही नियम आणि पद्धती आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. जाणून घ्या श्राद्ध भोजन देण्याची पद्धत काय आहे?
श्राद्ध भोजन देण्याची पद्धत
श्राद्ध पक्षात पितरांसाठी दिलेले ताट नेहमी विरुद्ध दिशेला ठेवावे आणि भस्माची रेषा काढावी.
अन्न देण्यासाठी, केळीच्या पानांपासून बनवलेले ताट किंवा पत्रावळींचा वापर करा. हे बाजारात सहज उपलब्ध आहेत.
श्राद्ध ब्राह्मणांच्या ताटात चुकूनही मीठ वेगळे देऊ नये.
गोड पदार्थ, लाडू तसेच शिजवलेले अन्न नेहमी आपल्या हातांनी वाढा.
भाजी, चटणी किंवा कोशिंबीर यांसारख्या इतर गोष्टींसाठी भांडे किंवा चमचा वापरा.
ताटात जेवण वाढण्याची मूलभूत शास्त्रे
श्राद्धासाठी ताटाच्या डाव्या, उजव्या, समोर आणि मध्य अशा चार भागांमध्ये (चौरस) पदार्थांचा उल्लेख आहे. सर्वप्रथम ताटात देशी तूप लावा. तांदूळ मध्यभागी आणि खीर, भाजी इत्यादी पदार्थ उजव्या बाजूला वाढावेत. यानंतर डाव्या बाजूला लिंबू, चटणी आणि कोंशींबीर वाढा. सांबर, कढी, पापड, भजी, उडीद वडा, लाडू असे पदार्थ समोर ठेवा. शेवटी, तूप आणि डाळ घालून भात वाढा.
या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या
श्राद्धासाठी तयार केलेल्या अन्नामध्ये, तुमच्या पूर्वजांना आवडलेली किमान एक गोष्ट नक्की तयार करा.
श्राद्ध भोजन देताना मनात भेदभावाची भावना ठेवू नका.
श्राद्ध विधी पूर्ण होईपर्यंत लहान मुले, पाहुणे किंवा घरातील इतर सदस्यांना अन्न देऊ नका.
आपल्या पूर्वजांना निरोप असा द्या
पितृपक्षाची समाप्ती सर्वपित्री अमावस्या तिथीला होते. या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे. पिंपळाच्या झाडाला पितरांचे निवासस्थान मानले जाते. त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. या दिवशी पितरांसाठी काळ्या तिळासह जल अर्पण करा, यामुळे घरामध्ये पितरांचा आशीर्वाद कायम राहील. पितरांना दूध, तीळ, कुशा, फुले आणि सुगंध मिसळलेले पाणी अर्पण करावे. असे मानले जाते की, जल अर्पण केल्याने पितरांची तहान भागते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :
Sarva Pitri Amavasya 2023 : यंदा सर्वपित्री अमावस्येला दुर्मिळ योगायोग, पितरांचा आशीर्वाद कायम राहील, 'हे' उपाय करा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)