एक्स्प्लोर

Relationship Tips : 'फ्रेंडशिप मॅरेज' म्हणजे काय? जपानमध्ये होतोय लोकप्रिय! नवीन रिलेशनशिप ट्रेंडबद्दल जाणून घेऊया

Relationship Tips : जगभर नात्यांमध्ये दररोज वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळत आहेत. सध्या फ्रेंडशिप मॅरेजचाही असाच ट्रेंड पाहायला मिळत आहे, जो जपानमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे.

Relationship Tips : बदलत्या काळानुसार नात्याचे स्वरुपही बदलत चाललंय. आजकाल विविध ट्रेंड आपल्याला दिसत आहेत. सध्या लोकांसाठी नात्याची व्याख्या झपाट्याने बदलत आहे. जगभर नात्यांमध्ये दररोज वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर रिलेशनशिपमध्ये अनेक प्रकारचे ट्रेंड लोकप्रिय होऊ लागले आहेत. सध्या फ्रेंडशिप मॅरेजचाही असाच ट्रेंड पाहायला मिळत आहे. जो सध्या जपानमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. हा विवाहाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये लोक एकमेकांवर प्रेम न करता किंवा शारीरिक संबंध न ठेवता जोडीदार बनत आहेत. या नवीन रिलेशनशिप ट्रेंडबद्दल जाणून घेऊया..

नात्याची व्याख्या झपाट्याने बदलतेय

आजकाल जपानमध्ये नवीन प्रकारचे नाते लोकप्रिय होत आहे. येथील तरुणांमध्ये फ्रेंडशिप मॅरेज मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्ट (SCMP) नुसार, या नवीन प्रकारच्या वैवाहिक संबंधात, लोक एकमेकांवर प्रेम न करता किंवा शारीरिक संबंध न ठेवता प्लॅटोनिक भागीदार बनत आहेत. हा ट्रेंड जपानमध्ये इतका लोकप्रिय झाला आहे की हजारो लोक, किंवा 124 दशलक्ष लोकसंख्येपैकी सुमारे एक टक्के लोक या प्रकारचे रिलेशनशिप निवडत आहेत. या नवीन रिलेशनशिप ट्रेंडबद्दल सविस्तर जाणून घेऊया-

'फ्रेंडशिप मॅरेज'( मैत्री विवाह) म्हणजे काय?

मैत्री विवाह हे एक अशा प्रकारचे रिलेशन आहे. ज्यामध्ये दोन्ही लोक कायदेशीररित्या जीवनात भागीदार असतात. परंतु प्रेम न करता किंवा एकमेकांशी लैंगिक संबंध न ठेवता जगतात. असे लोक एकत्र किंवा वेगळे राहू शकतात. तसेच, जर त्यांना मुलाचे नियोजन करायचे असेल तर ते कृत्रिम मार्गाने मुलाला जन्म देऊ शकतात. इतकेच नाही तर या नात्यात दोघेही एकमेकांची संमती असेल तोपर्यंत त्यांच्या लग्नाबाहेरील लोकांशी प्रेमसंबंध ठेवण्यासही मोकळीक असते. कलर्स नावाची एजन्सी, जी मैत्री विवाह करून देते, त्यांनी या नवीन ट्रेंडशी संबंधित डेटा शेअर केला आहे. त्यातील आकडेवारीनुसार, मार्च 2015 पासून आतापर्यंत जपानमध्ये जवळपास 500 जणांनी अशा प्रकारे लग्न केले आहे. एससीएमपीच्या म्हणण्यानुसार, एजन्सीने खुलासा केलाय की या जोडप्यांनी स्वत:ची घरे उभारली आहेत, तसेच काहींनी मुलांचे संगोपनही केले आहे.

मैत्री विवाहाची व्याख्या काय?

हे रिलेशन म्हणजे पारंपारिक, रोमँटिक प्रेमविवाह किंवा आपल्या जिवलग मित्राशी लग्न करण्यासारखे नाही, ही एक अशी पद्धत आहे, ज्यामध्ये जोडपे लग्नाच्या आधी भेटतात आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित सर्व गोष्टींवर चर्चा करतात. जसे की एकत्र जेवायचे की नाही, तास घालवायचे किंवा घराची विभागणी कशी करावी, घरातील कामे कशी विभागली जातील यावर सहमती दर्शवतात. अनरोमँटिक वाटत असूनही, या प्रकारच्या नातेसंबंधामुळे सुमारे 80% जोडप्यांना आनंदाने एकत्र राहण्यास मदत झाली आहे, बऱ्याच प्रकरणांमध्ये, काही जोडपी मुलांचे संगोपन देखील करत आहेत, असे एजन्सीने म्हटले आहे.

मैत्री विवाह कोण निवडत आहे?

SCMP नुसार, अशा प्रकारच्या नातेसंबंधात स्वारस्य असलेले लोक सरासरी 32 ते 33 वर्षांचे आहेत आणि त्यांचे उत्पन्नही जास्त आहे. पारंपारिक विवाह पद्धतीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या समलैंगिकांमध्ये देखील हे खूप लोकप्रिय आहे.

हेही वाचा>>>

Relationship Tips : पती-पत्नीच्या नात्यात विष पसरायला वेळ लागणार नाही, नातेवाईकांच्या 'या' 5 सल्ल्यांपासून सावधान! मानसशास्त्रज्ञ काय म्हणतात

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 07 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 630AM 07 January 2025 माझं गाव, माझा जिल्हासकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 07 January 2025  06AM SuperfastCRZ Scam Special Report | मुंबईत कोट्यवधींचा सीआरझेड घोटाळा, भूमी अभिलेखच्या नकाशांमध्ये फेरफार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Embed widget