(Source: ECI/ABP News/ABP Majha)
New Year Resolution नवीन वर्षात संकल्प करताय? 'या' टिप्सद्वारे बदलेल तुमचं आयुष्य, जाणून घ्या कसे?
New Year 2024 : नववर्षाच्या स्वागताला आता अवघे काही तासच शिल्लक आहेत. नववर्षाच्या सुरूवातीला अनेक जण नवनवीन संकल्प करतात. काम, आरोग्य, जिम यांसारख्या अनेक गोष्टींचा संकल्प केला जातो.
New Year Resolution : नववर्षाच्या (New Year 2024) स्वागताला आता अवघे काही तासच शिल्लक आहेत. नववर्षाच्या सुरूवातीला अनेक जण नवनवीन संकल्प करतात. आपले काम, आरोग्य, काही सवयी सोडणे अथवा लावणे, जिम करणे यांसारख्या अनेक गोष्टींचा संकल्प (New Year Resolution) केला जातो. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत की, यामुळे तुमचे आयुष्य सकारात्मक होईल. जाणून घ्या सविस्तर.
ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयास करा
या टिप्स फॉलो करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयास करावा लागेल. पहाटे साधारणपणे ४.३० ते ६.३० ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ मानली जाते. यावेळी उठून जर तुमची तुमच्या व्यक्तिमत्वावर भर दिला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. पहाटेच्या वेळी अत्यंत शांत वातावरण असते. त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठल्यामुळे स्वतःवर लक्ष केंद्रित करू शकता.
दिवसभराच्या तुलनेत सकाळी आपल्या डोक्यात कमी विचार असतात. त्यमुळे मन लवकर एकाग्र होण्यास मदत होते. सकाळच्या वेळी देवाचे नामस्मरण केल्याने आपला दिवस सकारात्मक जातो. तसेच सकाळी अभ्यास देखील चांगला होते. आपली स्मरणशक्ती सुधारते.
अलार्म वाजल्यावर लगेचच झोपेतून उठा
आपण अलार्म वाजला की तो बंद करून पुन्हा झोपत असतो. ही सवय सर्वप्रथम तुम्ही बंद करा. अलार्म वाजल्यावर तुम्ही झोपेतून उठून लगेचच उभे राहा. अलार्म बंद करा. वॉर्म अप करा. गरम पाणी प्या. त्यामुळे तुम्हाला परत झोपावेसे वाटणार नाही.
आपण आपल्या मेंदूत जे काही समाविष्ट करतो, त्यानुसार मेंदू आपल्या शरीराला सूचना देते. आपण जर आपले ध्येय निश्चित केले, तर आपल्याला अलार्म वाजण्याची वाट बघावीच लागणार नाही. अलार्म वाजण्याआधीच आपला मेंदू आपल्याला सूचना देईल आणि जाग येईल. दररोजच्या सरावातून तुम्हाला सकाळी उठण्याचे ध्येय प्राप्त होईल.
संकट काळात डगमगणार नाहीत
आपण अनेकदा प्रयत्न करून देखील सकाळी उठत नाहीत. आपल्याला उशिराने जाग येते आणि नंतर आपल्याला दिवसभर प्रश्चाताप करावा लागतो. यासाठी सकळी लवकर उठण्याची सवय लावा. एक दिवस उशिरा उठले म्हणून निराश होऊ नका. सकाळी उठण्याचा प्रयत्न करत राहा. यामुळे तुमचं संयम वाढेल. संयम वाढला की तुम्ही संकट काळात डगमगणार नाहीत.
दिवसभरात मित्र-मैत्रिणींना एकदा भेटा
आजच्या काळात आपण आपल्या मित्र मैत्रिणींसोबत दूर राहून देखील त्यांच्या संपर्कात राहू शकतो. तुमच्या एखाद्या मित्र, मैत्रिणीला सामील तुम्ही दिवसातून भेटले तर तुम्ही आनंदी राहू शकता. तुमच्या संकल्पात तुम्ही एखाद्या मित्र मैत्रिणीला सामील करून घेतले तर तुमचे ध्येय लवकर साध्य होऊ शकते.
रात्री झोपताना एखादे पुस्तक वाचा
दिवसभर आपण कोणत्या ना कोणत्या गॅझेटच्या सान्निध्यात असतो. रात्री झोपताना देखील आपल्या हातात मोबाईल असतो. त्यामुळे आपल्याला लवकर झोप लागत नाही. यासाठी रात्री एखादे पुस्तक वाचायची सवय लावा. पुस्तक वाचता वाचता लवकर झोप येते आणि सकाळी लवकर जाग येते. या टिप्स तुम्ही जर तुमच्या आयुष्यात आमलात आणल्या तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.