Maha Kumbh 2025: आजपासून कुंभमेळ्याला सुरूवात! ई-पास कसा मिळवाल? ऑनलाइन अर्ज कसा कराल? कोणते कागदपत्रे लागणार?
Maha Kumbh 2025: तुम्हीही महाकुंभ मेळ्याला जाण्याचा विचार करत असाल तर, सरकारने ई-पास सुविधा सुरू केली आहे, ती कशी बुक कराल? जाणून घ्या..
Maha Kumbh 2025: हिंदू धर्मात कुंभमेळ्याला मोठं महत्त्व आहे. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी एक महाकुंभ मेळा यंदा 13 जानेवारी ते 25 फेब्रुवारी 2025 या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित करण्यात येत आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा पवित्र संगम असलेल्या प्रयागराजमध्ये लाखो भाविक देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी या मेळ्याला उपस्थित राहतील. अशात भाविकांची मोठी गर्दी एका शहरात पोहोचणे ही काही सामान्य बाब नाही. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी येथे अनेक प्रकारचे नियम लागू केले जात आहेत. नियमांची अंमलबजावणी न झाल्यास भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यामुळेच उत्तर प्रदेश राज्य सरकारने भाविकांसाठी ई-पासची सुविधा आणली आहे. हे पास एकूण 6 रंगांचे असतील. तुम्हीही महाकुंभ मेळ्याला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या ई-पासची माहिती असणे आवश्यक आहे...
ई-पासची बुकींग कशी कराल?
- उत्तर प्रदेश सरकारच्या मते, यंदा महाकुंभमेळ्यात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
- अशा परिस्थितीत भाविकांची संख्या नियंत्रित करणे आणि ई-पास प्रणालीमुळे गर्दी टाळणे सोपे होऊ शकते.
- पासच्या माध्यमातून प्रवाशांचा डेटाही नोंदवला जाऊ शकतो. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना टाळता येऊ शकते.
- ई-पास प्रणालीमुळे भाविकांची ओळख पटवणे आणि कोणतीही परिस्थिती उद्भवल्यास त्यांना मदत करणे सोपे होईल.
ई-पासची सुविधा कोणाला मिळणार?
ई-पासची ही सुविधा व्हीव्हीआयपी लोक, मीडिया, पोलिस आणि अत्यावश्यक सेवांसाठी जारी करण्यात आली आहे. त्यामुळे मेळ्यातील वाहतूक आणि गर्दी नियंत्रित करणे अधिक सोपे होणार आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मेळ्यात तुम्ही तुमची गाडी कुठेही पार्क करू शकत नाही. यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. प्रयागराज त्रिवेणी संगम स्थळी जाणाऱ्या लोकांना या पासेसचा लाभ मिळणार आहे.
जाणून घ्या कोणाला मिळणार कोणत्या रंगाचा ई-पास?
पांढऱ्या रंगाचा ई-पास: उच्च न्यायालय, व्हीआयपी, परदेशी राजदूत आणि अनिवासी भारतीयांसाठी (NRI) पांढऱ्या रंगाचा ई-पास जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या लोकांना महाकुंभ काळात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि प्रशासनाचीही मदत त्यांना सहज मिळणार आहे.
भगव्या रंगाचा ई-पास - भगव्या रंगाचा ई-पास आखाडे आणि धार्मिक संस्थांसाठी जारी करण्यात आला आहे.
पिवळ्या रंगाचा ई-पास - पिवळ्या रंगाचा ई-पास दुकानदार, फूड कोर्ट आणि मिल्क बूथ यांसारख्या सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
आकाश निळ्या रंगाचा ई-पास – माध्यम कर्मचाऱ्यांसाठी आकाश निळ्या रंगाचा ई-पास जारी करण्यात आला आहे.
निळ्या रंगाचा ई-पास- पोलीस दलासाठी निळ्या रंगाचा ई-पास जारी करण्यात आला आहे.
लाल रंगाचा ई-पास- आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवांसाठी लाल रंगाचा ई-पास जारी करण्यात आला आहे.
ई-पास बुक कसे करायचे? जाणून घ्या
- ई-पास बुक करण्यासाठी प्रथम सरकारने जारी केलेल्या https://epass.kumbh25.in/ वरून तुम्ही बुकींग करू शकता.
- संकेतस्थळावर ई-पास बुकिंगची सुविधा अद्याप सुरू झालेली नाही, महाकुंभ सुरू झाल्यानंतर लवकरच येथून बुकिंग करता येईल, अशी शक्यता आहे.
- वेबसाइटवर ई-पास बुकिंग येथून बुक करू शकाल.
- लक्षात ठेवा, पास मंजूर होण्यास वेळ लागतो. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला ज्या कलर पाससाठी अर्ज करायचा आहे त्याच्याशी संबंधित कागदपत्रे द्यावी लागतील.
- त्याच्याशी संबंधित कागदपत्रे द्यावी लागतील. महाकुंभमेळ्याला भेट देणार असाल तर लक्षात ठेवा
- भाविकांच्या सोयीसाठी राज्य सरकारकडून लोकांना राहण्यासाठी तंबूची सुविधाही तयार करण्यात आली आहे.
- यासोबतच तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून महाकुंभ तंबूही बुक करू शकता.
कधीपर्यंत असणार कुंभमेळा?
धार्मिक मान्यतेनुसार, सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा महाकुंभमेळा सुरू होतो. यावर्षी प्रयागराजमध्ये 13 जानेवारी 2025 पासून महाकुंभ सुरू होणार आहे. महाकुंभ दरम्यान संगमामध्ये स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते. 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाकुंभ संपणार आहे. असे मानले जाते की, ज्या ठिकाणी अमृताचे थेंब पडले ते पवित्र झाले. या ठिकाणी स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होतो. त्यामुळे या चार ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. कुंभमेळ्याच्या वेळी या नद्यांमध्ये स्नान केल्याने सर्व पापे धुऊन जातात आणि मोक्ष प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे.
हेही वाचा>>>
Maha Kumbh 2025: ऐकलंत का? कुंभमेळ्याला जाण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवाच, काही समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )