Lifestyle : आश्चर्यच..! चक्क श्वानांसाठी महागडे परफ्यूम लॉंच, 24 कॅरेट सोन्याचा मुलामा, किंमत जाणून बसेल धक्का, खासियत जाणून घ्या
Lifestyle : एका नामांकित कंपनीने खास श्वानांसाठी महागडे परफ्यूम लॉंच केले आहे, ज्याची किंमत पाहून तुम्हीही हैराण व्हाल.. या परफ्यूमची खासियत काय आहे?
Lifestyle : लग्न असो...साखरपुडा असो.. किंवा डेट.. अनेकजण परफ्यूम लावल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत. अनेक जणांना परफ्यूम, अत्तर लावण्याचा छंद असतो. महिला आणि पुरुषांसाठी विविध सुगंधी परफ्यूम बाजारात आपण हमखास पाहतो. विविध परफ्यूमच्या सुगंध आणि गुणवत्तेवर त्याची किंमत ठरत असते. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, एका नामांकित कंपनीने खास श्वानांसाठी एक असे महागडे परफ्यूम लॉंच केले आहे, ज्याची किंमत पाहून तुम्हीही हैराण व्हाल.. या परफ्यूमची खासियत काय आहे? त्याची किंमत काय आहे? हे जाणून घेऊया.
Dolce & Gabbana ने कुत्र्यांसाठी परफ्यूम लाँच केले
इटालियन फॅशन ब्रँड Dolce & Gabbana ने नुकतेच एक प्रॉडक्ट लाँच केले आहे, ज्याबद्दल तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल. या ब्रँडने डॉग परफ्यूम (Dolce Gabbana dog perfume launch) लाँच केले आहे, जे प्रसिद्ध फॅशन डिझायनर Domenico Dolce यांच्या नावाने लाँच केले आहे. इटालियन ब्रँड डोल्से अँड गब्बाना हे फॅशन जगतात एक प्रसिद्ध नाव आहे. महागड्या कपड्यांपासून ते परफ्यूमपर्यंत, फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळोवेळी ट्रेंड सेट करत आहे, परंतु यावेळी D&G ने एक प्रॉडक्ट लॉन्च केले आहे, जे महिला, पुरुष किंवा मुलांसाठी नाही तर आपल्या पाळीव श्वानासाठी आहे. होय, यावेळी या कंपनीने खास श्वानांसाठी बनवलेले प्रॉडक्ट लाँच केले आहे.
View this post on Instagram
या परफ्यूमची खासियत काय आहे?
D&G ने Domenico Dolce च्या पाळीव श्वानांसाठी Fifi या नावाचा परफ्यूम लॉन्च केला. या परफ्यूमच्या बाटलीवर श्वानाचे सोनेरी पंजे आहेत. डोल्से आणि गब्बाना यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे या परफ्यूमबद्दल सांगितले. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, हे अल्कोहोल मुक्त सुगंधित परफ्यूम आहे, जे खास श्वानांसाठी बनवले आहे. हे परफ्यूम लाल कॅपसह हिरव्या बाटलीत पॅक केले जाते. या बाटलीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा मुलामा असलेला श्वानाचा पंजा आहे.
किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल
या परफ्यूमचे केवळ पॅकेजिंगच नाही तर त्याची किंमतही आश्चर्यकारक आहे. कंपनीने या परफ्यूमची किंमत 100 डॉलर्स म्हणजे सुमारे 9000 रुपये घोषित करण्यात आली आहे. हे परफ्यूम कस्तुरी.. चंदन.. विविध सुगंधित साहित्यांनी बनवले जाते. वासाची जाणीव श्वानांना माणसांपेक्षा जास्त असल्याने श्वानांच्या मालकांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा परफ्यूम त्यांच्या नाकाजवळ लावू नये. ते लावताना आधी हाताला लावा आणि नंतर त्यांच्या शरीराला असे सांगण्यात आले आहे.
श्वानांसाठी परफ्यूम सुरक्षित आहे का?
श्वानांना परफ्यूम लावण्यापूर्वी, तुम्हाला रॉयल सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी ऑफ ॲनिमल्स (आरएसपीसीए) च्या चेतावणीबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. सभोवतालच्या परिस्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी श्वान त्यांच्या वासाच्या इंद्रियांवर अवलंबून असतात. त्या वासाद्वारे मानव आणि प्राण्यांशी संवाद साधतात, परंतु परफ्यूम वापरल्याने त्यांना तसे या कार्यात अडथळी येऊ शकतो. काही परफ्यूमचा सुगंध कुत्र्यांना चेतवू शकतो किंवा त्यांना ते आवडणार देखील नाही. म्हणून, कुत्र्यांसाठी परफ्यूम अतिशय काळजीपूर्वक वापरा.
हेही वाचा>>>
Health : पुन्हा नवं संकट? आफ्रिकन देशांमध्ये Mpox आजाराचा कहर, WHO चा इशारा, 'ही' लक्षणं तुम्हाला तर नाही ना?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )