Health Tips : सुंठ आणि लवंग एकत्रित खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे! जाणून घ्या...
Health Tips : सुंठ आणि लवंग हे घटक आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. सुंठ आणि लवंग एकत्रित खाल्ल्याने अनेक फायदे होतात.
![Health Tips : सुंठ आणि लवंग एकत्रित खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे! जाणून घ्या... Know the many health benefits of eating dry ginger and cloves together Health Tips : सुंठ आणि लवंग एकत्रित खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे! जाणून घ्या...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/18/1b7ac78cb8133cbac1a637d506d5c3fa_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dry Ginger With Clove: सुंठ (Dry Ginger) आणि लवंग (Clove) हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. सुंठाचा उपयोग आयुर्वेदात औषध म्हणून केला जातो. सुंठ आणि लवंग एकत्र सेवन केल्याने तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. सुंठ अनेक समस्यांवर गुणकारी आहे. आले सुकवून बनवले जाणारे सुंठ अनेक समस्यांवर गुणकारी ठरते. याचा आहारात मसाला म्हणूनही वापरला जातो. सुंठ आणि लवंगमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि बीटा सारखे गुणधर्म असतात. चला तर, जाणून घेऊया सुंठ आणि लवंग खाल्ल्याने कोणते फायदे होतात..
सुंठ आणि लवंगाचे फायदे
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त : सुंठ आणि लवंग यांचे सेवन शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. सुंठ आणि लवंगामध्ये कॅपलिसिन आणि कर्क्यूमिनसारखे अँटी-ऑक्सिडंट घटक आढळतात. या दोन्हींचे एकत्र सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
दातदुखीच्या समस्येवर फायदेशीर : लवंग आणि सुंठामध्ये असलेले औषधी गुणधर्म वेदना दूर करण्यासाठी खूप उपयुक्त मानले जातात. लवंग हा वेदना कमी करणारा उपयुक्त घटक आहे. लवंगामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म दातदुखीवर खूप फायदेशीर मानले जातात. लवंग आणि सुंठ यांचे सेवन केल्याने दातदुखीमध्ये आराम मिळतो.
श्वसनाच्या समस्यांवर आराम : लवंग आणि सुंठ यांचा काढा करून प्यायल्याने श्वसनाच्या समस्यांवर खूप फायदा होतो. सुंठ, लवंग आणि मध एकत्र मिसळून खाल्ल्याने श्वसनाच्या समस्यांवर आराम मिळतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
हेही वाचा :
- Pineapple Benefits: अननस खा अन् वजन कमी करा! जाणून घ्या याचे फायदे...
- Lassa fever : ओमायक्रॉननंतर धुमाकूळ घालतोय 'लासा फिवर'; काय आहेत लक्षणं?
- Weight Loss : वजन कमी करण्यासाठी अनोशेपोटी घ्या 'हे' ड्रिंक्स
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)