Japanese People Long Life Secret : जपानी लोकांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्याचे रहस्य काय आहे? जाणून घ्या
जपानमधील लोक जगभर प्रदीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी ओळखले जातात. जपानमधील महिलांचे सरासरी वय हे 86 वर्ष आहे तर पुरूषांचे वय हे 80 च्या आसपास आहे.
Why Japanese People Live Longer : बदलत्या जीवनशैलीमुळे भारतातील लोकांचे आयुर्मान मोठ्या प्रमाणात कमी झालेले पाहायला मिळते. तरूण वयातच अनेकांना गंभीर आजार होताना दिसतात. त्यामुळे पुढील आयुष्य त्याच आजारासोबत जगावे लागते. यामुळे अगदी कमी वयात अनेक लोकांना जीव गमवावा लागतो. मात्र याच्या उलट परिस्थिती आहे ती जपान मधील लोकांची. येथील लोकांचे आयुर्मान जास्त आहे. जपानमधील लोक जगभर प्रदीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी ओळखले जातात.
जपानमधील महिलांचे सरासरी वय हे 86 वर्ष आहे तर पुरूषांचे वय हे 80 च्या आसपास आहे. भारतातील लोकांचे वय 69 आहे. जपानी लोक जास्त काळ कसे काय जगतात. त्यामागील नेमके कारण काय हे जाणून घेऊयात.
भूक आहे त्यापेक्षा कमी खाणे
जपान मधील लोकांमध्ये खाण्याच्या बाबतीत बरीच शिस्त आहे. येथील लोक पोट भरेपर्यंत जेवण करत नाहीत. हे लोक 80% पोट भरेल इतकेच खातात.
खूप स्वच्छता आणि उत्तम आरोग्य सेवा
जपानची आरोग्य सेवा प्रणाली खूप प्रगत आहे. याठिकाणी सर्व प्रकारची लसीकरण मोहिम न चूकता नियमीतपणे राबवली जाते. तसेच निरोगी जीवनशैलीबद्दल इथे लोकांना वेळोवेळी जागरूक केले जाते. जसे की रोजच्या जेवणात काय खावे, काय खाऊ नये, मीठाचा वापर किती आणि केवढा करावा, आदीसह इतर आरोग्यविषयक माहिती दिली जाते.
खाण्याची शैली
जपानी लोक त्यांच्या ताटात अगदी कमी अन्न घेतात आणि सावकाश जेवण करतात. ते लहान ताटात किंवा छोट्या बाऊलमध्ये अन्न खातात. मोबाईल किंवा टिव्ही पाहत जेवण करणे या लोकांना आवडत नाही. विशेष म्हणजे ते जमिनीवर बसून जेवण करतात.
चहा पिण्याची परंपरा
जपानी लोकांना चहा प्यायला खूप आवडते. चहा तेथील लोकांचे आवडते पेय आहे. त्यांची माचा चहाची परंपरा जगभर प्रसिद्ध आहे. त्यांच्या या चहामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक आणि अँटीआॅक्सिडंट असतात. हा चहा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतो. गंभीर आजारांपासून दूर ठेवतो.
जपानी अन्न
जपानी अन्न हे भरपूर पोषक तत्वांनी समृद्ध असते. ते हंगामी फळे, मासे, तांदूळ, संपूर्ण धान्य, टोफू, सोया आणि कच्च्या भाज्या खातात. या सर्व गोष्टींमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स आणि साखरेचे प्रमाण कमी असते. त्यात अनेक जीवनसत्त्वे आणि पोषक घटक असतात. या गोष्टींमुळे कर्करोग आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
व्यायाम
येथील लोकांना चालायला खूप आवडते. इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण चालत फिरतो. बहुतेक लोक चालत किंवा सायकलने आॅफिसला जातात. तसेच येथील लोकांना व्यायामाची देखील मोठी आवड आहे.
इतर महत्वाच्या बातम्या