एक्स्प्लोर
प्रजासत्ताक दिनी 'स्वच्छ भारता'साठी 7 हजार विद्यार्थ्यांची मानवी साखळी

वाशिम: वाशिममधील विद्यार्थ्यांनी या वर्षीचा प्रजासत्ताक दिन स्वच्छ भारत अभियानाला समर्पित केला. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात, मानवी साखळीच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानाचा लोगो साकारण्यात आला. या मानवी साखळीमध्ये तब्बल 7 हजार विद्यार्थी सहभागी झाले. पोलीस कवायद मैदान येथे पार पडलेल्या या विक्रमी कार्यक्रमाची गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं नोंद घेतली आहे. अशा प्रकारच्या उपक्रमामुळं स्वच्छ भारतचा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
आणखी वाचा























