एक्स्प्लोर
27th MALABAR Exercise | सिडनीत अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारतीय नौदलाचा 27वा थरारक मलबार युद्धसराव...
27th MALABAR Exercise : अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या नौदलांसोबत भारतीय नौदलाच्या स्वदेशी बनावटीच्या नौका INS कोलकाता, INS सह्याद्री आणि P8I विमानांसोबत सिडनीजवळ मलबार युद्धसराव...
27th edition of Exercise MALABAR
1/8

इंडो-पॅसिफिक (Indo-Pacific) प्रदेशातील चीनची दादागिरी संपुष्टात आणण्यासाठी भारत-अमेरिका-जपान-ऑस्ट्रेलिया हे चार देश एकत्र आले आहेत. (PTI Photo)
2/8

१९९२ पासून भारत-अमेरिका-जपान-ऑस्ट्रेलिया या चार देशांचा दरवर्षी संयुक्त युद्धसराव आयोजित केला जातो यालाच 'मलबार युद्धसराव' असं म्हणतात (PTI Photo)
3/8

यंदा २७वा युद्धसराव ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनार्यावर सिडनीजवळ सुरु आहे (PTI Photo)
4/8

भारताच्या वतीनं या युद्धाभ्यासात भारतीय नौदलाच्या स्वदेशी बनावटीच्या नौका INS कोलकाता, INS सह्याद्री आणि तसेच P81 फ्लीट एअरक्राफ्ट सहभागी झालं आहे. (PTI Photo)
5/8

येत्या काळात क्वॉड देशांची सहमती असेल तर मलबार युद्धाभ्यासामध्ये इतर काही मित्र देशांचाही सहभाग केला जावू शकतो असं अमेरिकेच्या नौदल प्रमुखांनी म्हटलं आहे. (PTI Photo)
6/8

क्वाड देशांच्या या युद्धाभ्यासामुळे चीनचा मात्र थयथयाट झाल्याचं चित्र आहे. चीनने वेळोवेळी मलबार युद्धाभ्यासाला विरोध केला आहे. (PTI Photo)
7/8

हिंदी महासागरातील संपूर्ण वर्चस्वासाठी चीनने पावले उचलायला सुरुवात केली असून या भागातील अनेक देशांच्या सीमांवर आपले नौदल तैनात केलं आहे. (PTI Photo)
8/8

चीनच्या या वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भारत-अमेरिका-जपान-ऑस्ट्रेलिया या क्वाड देशांचा प्रयत्न आहे. (PTI Photo)
Published at : 22 Aug 2023 02:57 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























