एक्स्प्लोर
यूट्यूब आणि व्हॅलेंटाईन्स डेचं ‘हे’ नातं तुम्हाला माहित आहे का?
2005 सालीच ‘टाईम’ मॅगझिनने यूट्यूबला ‘पर्सन ऑफ द ईयर’ म्हणून निवडलं होतं, शिवाय कव्हर पेजवरही जागा दिली होती.
मुंबई : यूट्यूब जगातील सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या व्हिडीओ सर्च इंजिनपैकी एक आहे. गूगलनंतर सर्वात जास्त वापर यूट्यूबचा होतो. कुणी आवडती गाणी ऐकण्यासाठी, कुणी सिनेमे, तर कुणी मालिका... किंवा आणखी काही. मात्र व्हिडीओ सर्च इंजिन म्हणून यूट्यूबला अद्याप तरी पर्याय नाही.
याच यूट्यूबचं व्हॅलेंटाईन्स डेशी एक अनोखं नातं आहे. उद्या (14 फेब्रुवारी) व्हॅलेंटाईन डे आहे. त्यानिमित्ताने आम्ही तुम्हाला हे नातं काय आहे, ते सांगणार आहोत.
यूट्यूबचं डोमेन व्हॅलेंटाईन्स डे म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी नोंदवण्यात आलं होतं. चॅड हर्ले, स्टिव्ह चेन आणि जावेद करीम या तीन मित्रांनी मिळून 14 फेब्रुवारी 2005 रोजी यूट्यूबची सुरुवात केली होती. PayPal या ऑनलाईन पेमेंट कंपनीत हे तिघेही मित्र एकत्र काम करत होते. त्यावेळीच यूट्यूबची कल्पना त्यांना सूचली.
चॅड हर्ले, स्टिव्ह चेन आणि जावेद करीम यांनी ज्यावेळी यूट्यूबची सुरुवात केली, त्यावेळी त्यांनी कल्पनाही नव्हती की, यूट्यूब इतकं लोकप्रिय होईल!
14 फेब्रुवारी 2005 रोजी यूट्यूबची सुरुवात झाली असली, तरी पहिला व्हिडीओ एप्रिल 2005 मध्ये अपलोड करण्यात आला. ‘मी अॅट द झू’ असे त्या पहिल्या व्हिडीओचे नाव होते. आतापर्यंत या व्हिडीओला जवळपास 5 कोटी 56 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.
यूट्यूब दिवसागणिक इतकं लोकप्रिय होत गेलं, की व्हिडीओ पाहण्यासाठी सर्वाधिक वापर होऊ लागला. त्यानंतर इंटरनेटच्या प्रांतातील जायंट मानल्या जाणाऱ्या गूगलने 2006 साली यूट्यूबच्या खरेदीची घोषणा केली. गूगलने 1.65 अब्ज यूएस डॉलर्सना यूट्यूब खरेदी केलं.
2005 सालीच ‘टाईम’ मॅगझिनने यूट्यूबला ‘पर्सन ऑफ द ईयर’ म्हणून निवडलं होतं, शिवाय कव्हर पेजवरही स्थान दिले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement