Waterfalls : पावसाळ्यात सहलीचा प्लॅन करताय? मग मुंबईजवळील 'या' धबधब्यांना नक्की भेट द्या...
Monsoon Trip Places : मुंबईजवळील धबधबे तुमच्यासाठी वीकेंडचा आनंद घेण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. या धबधब्यांना तुम्ही नक्की भेट द्या.
Waterfalls Near Mumbai : मुंबई (Mumbai) मायानगरी कायमच गजबजलेली आणि व्यस्त असते. या व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढून प्रत्येकालाच विश्रांतीची गरज असते. सध्या पावसाळा सुरु झाला आहे. या पावसाळ्यात तुम्हीही फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर मुंबईजवळील काही ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता. या ठिकाणी नैसर्गिक सौंदर्याची मजा घेत तुम्ही एक दिवसीय सहलीसाठी जाऊ शकता. मुंबईपासून अगदी काही अंतरावर असलेले धबधबे (Best Waterfalls to Visit In Monsoon) तुमच्यासाठी वीकेंडचा आनंद घेण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. या धबधब्यांना (Waterfalls to Visit Near Mumbai) तुम्ही नक्की भेट द्या.
1. भिवपुरी धबधबा, कर्जत
कर्जतजवळील भिवपुरी धबधबा हा मुंबईजवळील सर्वोत्तम धबधब्यांपैकी एक आहे. तुम्हाला मुंबई शहरापासून दूर जायचे नसेल, तर हा बेस्ट पर्याय आहे. निसर्ग सान्निध्य आणि हिरवाईमुळे हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. एक दिवसाच्या सहलीसाठी मुंबईजवळील ठिकाणं शोधत असाल तर भिवपुरी धबधब्याला नक्की भेट द्या.
2. पांडवकडा धबधबा, खारघर, नवी मुंबई
पांडवकडा धबधबा हा नवी मुंबई जवळील सर्वात प्रसिद्ध धबधबा आहे. हा शहरापासून फक्त एक तासाच्या अंतरावर आहे. पांडवकडा टेकड्यांमध्ये वसलेले आहे. सर्व मुंबईकरांसाठी, विशेषतः पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. जर तुम्ही मुंबईपासून जवळचा धबधबा शोधत असाल तर पांडवकडा धबधबा हा पर्याय चांगला आहे.
3. भगीरथ धबधबा, वांगणी
वांगणी धबधबा म्हणूनही ओळखला जाणारा, मुंबईजवळील भगीरथ धबधबा हे ही पर्यटकांचं आकर्षण आहे. जास्त जणांना अद्याप याबाबत माहिती नसल्यामुळे तुलनेने इतर ठिकाणांपेक्षा येथे जास्त गर्दी होत नाही. तुम्ही कुटुंबिय आणि मित्रपरिवारांसह तुम्ही या धबधब्याचा आनंद घेऊ शकता.
4. लिंगमाला धबधबा, पाचगणी
लिंगमाला धबधबा हा मुंबईजवळील आणि महाबळेश्वरमधील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे. मुंबईपासून अवघ्या 5 तासांच्या अंतरावर, असलेला हा धबधबा एक दिवसीय सहलीसाठी उत्तम पर्याय आहे. यावेळी तुम्ही महाबळेश्वरमधील इतर ठिकाणांनाही भेट देऊ शकता.
5. देवकुंड धबधबा, भिरा
या धबधब्यांच्या सभोवतालची शांतता आणि शांतता केवळ अतुलनीय आहे. देवकुंड धबधबा हे अशा काही धबधब्यांपैकी एक आहेत जे एका दिवसाच्या पिकनिकसाठी योग्य ठिकाण आहे. तुम्ही काही ट्रेकिंगमध्ये सहभागी होऊ शकता आणि घाईघाईने अॅड्रेनालाईनची गर्दी तृप्त करू शकता. हा ट्रेक थोडा खडकाळ आहे पण हिरवीगार हिरवीगार झाडे आणि आजूबाजूला विलोभनीय जीवजंतू या धबधब्यांची सहल यावर घालवलेल्या प्रत्येक सेकंदाला किंमत देते. पाणी स्वच्छ आणि मूळ आहे, जे तुम्हाला आराम करण्यास मदत करते.
धबधब्याला भेट द्या पण, काळजी घ्या...
दरम्यान, पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी ट्रेकींग आणि धबधब्यांना भेट द्या, पण यावेळी योग्य काळजी घ्या. मान्सूनमध्ये अशा ठिकाणी काही दुर्घटना घडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे योग्य माहिती आणि काळजी घेत या ठिकाणांना भेट द्या. एखाद्या ठिकाणाला भेट देताना, संबंधित ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या सुचना आणि नियमांचं पालन करा. दुर्घटना घडलेल्या काही ठिकाणी प्रशासनाने जाण्यास बंदीही घातली आहे, त्यामुळे या ठिकाणी जाण्याआधी पुरेशी आणि योग्य माहिती घ्या आणि स्वत:ची, कुटुंबिय तसेच मित्र परिवाराचीही योग्य काळजी घ्या.