(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut Full PC : ईव्हीएमसंदर्भात संजय राऊतांकडून शंका व्यक्त; म्हणाले आमच्याकडे 450 तक्रारी
Sanjay Raut Full PC : ईव्हीएमसंदर्भात संजय राऊतांकडून शंका व्यक्त; म्हणाले आमच्याकडे 450 तक्रारी
हेही वाचा :
राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर पहिल्या 4 फेरीत महायुतीला मोठा विजय मिळत असल्याचे दिसून येते. महायुतीने (Mahayuti) तब्बल 200 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली असून भाजपनेही शतकेपार झेंडा रोवल्याचे पाहायला मिळाले. तर, महाविकास आघाडीच्या जागा केवळ 60 ते 70 ठिकाणी आघाडीवर दिसून येतात. त्यामुळे, निकालाच्या प्राथमिक आकडेवारीवरुन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेना प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनीही संताप व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणूक निकालांची प्राथमिक आकडेवारी पाहता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हा निकाल मान्य नसल्याचे सांगत, कुछ तो गडबड है अशी प्रतिक्रिया दिली. या निकालामागे खूप मोठे कारस्थान आहे, निकाल लावून घेतलेला दिसतोय. महाविकास आघाडीला 75 ते 100 जागाही देत नसाल तर हा निकाल ठरवून लावला आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी निकालावर भाष्य केलं आहे. निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले, तुफानी फटकेबाजी