(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : फंगल इन्फेकशन म्हणजे नेमकं काय? हा आजार न होण्यासाठी उपचार आणि काळजी कशी घ्यावी? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Fungal Infection Treatment : फंगल इन्फेक्शनचा त्रास अनेकांना होतो. मात्र, याची वेळीच देखल घेतल्यास हा संसर्ग बराही होतो.
Fungal Infection Treatment : फंगल इन्फेक्शन (बुरशीजन्य संसर्ग) (Fungal Infection) हा असा संसर्ग आहे जो संपूर्ण जगात आढळून येतो. जेव्हा एखादी बाह्य बुरशी शरीरातील एक विशिष्ट भागावर जमा होते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती त्याच्याशी सामना करण्यास सक्षम नसते, तेव्हा ही समस्या उद्भवते. या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या आपल्या 'डॉक्टर टिप्स' या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
फंगल इन्फेक्शनचा त्रास अनेकांना होतो. मात्र, याची वेळीच देखल घेतल्यास हा संसर्ग बराही होतो. या संसर्गाबाबत सांगताना डॉ. मानसिंग शिंदे (Dr. Mansingh Shinde) (त्वचारोग तज्ज्ञ, कोल्हापूर) म्हणतात की, फंगल इन्फेक्शन सध्या खूपच कॉमन आहे. फंगल इन्फेक्शन हे एक प्रकारची बुरशी असते.
फंगल इन्फेक्शन कशामुळे होते?
1. ओलसर त्वचेवर परिणाम होतो : आपली त्वचा ओलसर राहिली तर त्यामुळे होणारे हे आजार जास्त व्हायची शक्यता असते. जास्त करून जांघेत किंवा काखेत जिथे त्वचा ओलसर राहते त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.
2. संसर्गामुळे होणारा आजार : एका व्यक्तीला फंगल इन्फेक्शन असेल तर त्यामुळे ते दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतात. हा संसर्गजन्य आजार आहे. एका व्यक्तीला फंगल इन्फेक्शन झालं असेल त्याच व्यक्तीचा साबण, टॉवेल वापरला इतर काही वस्तू वापरल्या त्यामुळे हा आजार इतर लोकांना पसरू शकतो.
3. अतिरिक्त औषधांच्या वापरामुळे : काही पेशन्ट्स स्वत:च्या मनाने स्टीरॉईड्स नावाचे मलम वापरतात. त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.
4. डायबिटीस असलेल्या रूग्णांना धोका : एखाद्या पेशन्टला डायबिटीस असेल किंवा प्रतिकारशक्ती कमी असणारे आजार झाले तर त्या पेशन्टला हे आजार होण्याची शक्यता जास्त असते.
फंगल इन्फेक्शनवर उपाय काय?
फंगल इन्फेक्शन संबंधित एखाद्या व्यक्तीने जर ट्रिटमेंट घेतली तर ती नीट पूर्ण केली पाहिजे. बरेच पेशन्ट आजार बरा झाला की, औषध बंद करतात. मात्र, तसे न करता 100 टक्के आजार बरा झाल्यानंतरसुद्धा पुढे काही दिवस औषध चालू ठेवणे गरजेचे आहे.
फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी काय करावे?
- जर शरीराची नीट काळजी घेतली तर फंगल इन्फेक्शन कधीच होणार नाही.
- त्वचा ओलसर ठेवली नाही तर हे आजार व्हायची शक्यता फार कमी असते.
- पावसाळ्यात बरेच जण ओले कपडे घालतात. त्यामुळे सुद्धा फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तसेच कपडे सुती आणि सैल असावेत. अंग कोरडे ठेवणे ही काळजी जर घेतली तर हा त्रास होणार नाही.
- बऱ्याचदा पेशन्ट्सना पायांच्या मधल्या बोटांमध्ये फंगल इन्फेक्शन होते. त्याला चिखल्या म्हणतात. हासुद्धा फंगल इन्फेक्शनचा एक प्रकार आहे. पाय धुतल्यानंतर बोटांच्या मधील जागा कोरडी ठेवायला हवी. अशी काळजी घेतली तर फंगल इन्फेक्शनची संख्या खूपच कमी होते.
पाहा व्हिडीओ :
महत्त्वाच्या बातम्या :
Winter Skin Care Tips : हिवाळ्यात त्वचा कोरडी का पडते? यावर उपाय काय? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )