(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hair Care : पावसाळ्यात केसांची अशी घ्या काळजी, मध आणि केळीच्या हेअर मास्कने केसांना बनवा निरोगी
पावसाळ्यात वाढलेल्या आर्द्रतेमुळे केस गळू लागतात. त्यामुळे केस निरोगी राहत नाहीत. अशा वेळी मध आणि केळीचा मास्क तुमच्या केसांकरता फायदेशीर ठरू शकतो.
Mansoon Hair Care Tips : पावसाळ्यात वाढलेल्या आर्द्रतेमुळे केस गळू लागतात, त्यामुळे केस तुटण्याची समस्या खूप वाढते. अशा परिस्थितीत, महिला अनेकदा घरगुती उपायांच्या मदतीने ही समस्या घरी सोडवण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी मध (Honey) आणि केळीचा (Banana) केसांकरता मोठा फायदा होऊ शकतो ज्यामुळे पावसाळ्यात तुमच्या केसांना योग्य ते पोषण मिळण्यास मदत होते.
पावसाळ्यासात केसांना लावा केळी आणि मध हेअर मास्क
साहित्य
केळी - 1
मध - 1 टीस्पून
दही - 2 टेबलस्पून
नारळ तेल - 1 टेबलस्पून
हेअर मास्क बनवण्याची पद्धत
1. हेअर मास्क तयार करण्यासाठी, प्रथम एक पिकलेले केळे एका वाडग्यात पेस्ट होईपर्यंत स्मॅश करा.
2. आता स्मॅश केलेल्या केळीमध्ये मध, दही आणि खोबरेल तेल घाला. हे सगळे एकत्र करा.
3. आता केस हलके ओले करा. त्यानंतर ओल्या केसांना हेअर मास्क लावा.
4. केसांना हेअर मास्क लावताना ते केसांच्या मुळापासून शेवटपर्यंत लावा. मास्क संपूर्ण केसांमध्ये समान रीतीने लागला पाहिजे.
5. एकदा का तुम्ही सर्व केसांना मास्क लावला की, रक्ताभिसरण सुधारण्यासाठी तुमच्या स्काल्पला काही मिनिटे हलक्या हाताने मसाज करा.
6. मसाज केल्यानंतर, गरम पाण्यात टाॅवेल बुडवा त्याला पिळून घ्या आणि केसांना गुंडाळा.
7. हेअर मास्क अर्धा तास ते एक तासापर्यंत राहू द्या, जेणेकरुन हे घटक तुमच्या केसांना खोलवर पोषण देऊ शकतील.
8. आता आपले केस कोमट पाण्याने चांगले धुवा, त्यानंतर तुमच्या आवडत्या शैम्पू आणि कंडिशनर वापरून केस स्वच्छ धुवून घ्या.
हेअर मास्कमधील घटकांचे फायदे
1. केळी
केळी केसांना मॉइश्चरायझिंग, मऊ आणि चमक आणण्यास मदत करते.
2. मध
हे एक नैसर्गिक humectant आहे जे तुमच्या केसांमधील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते आणि कोरडेपणा कमी होतो. केसांना पोषण देणारे अँटिऑक्सिडंट (Anti-oxident) देखील त्यात असतात.
3. दही
दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड (Lactic Acid) असते, जे घाण स्काल्प स्वच्छ करण्यास मदत करते. तसेच केसांना चमक येते आणि केस मुलायम होतात.
4. नारळ तेल
नारळ तेल त्याच्या डिप कंडिशनिंग गुणधर्मांसाठी ओळखले जाते. खोबरेल तेल केसांच्या मुळांना हायड्रेट (Hydrate) ठेवण्यास आणि केस गळणे कमी करण्यास मदत करते.
इतर महत्वाच्या बातम्या