एक्स्प्लोर

Red Honey: दारुपेक्षा जास्त नशा 'या' लाल मधात! जगभरातून मोठी मागणी; कुठे मिळतं हे मध?

GK: तुम्ही साध्या मधाबद्दल तर ऐकलंच असेल, पण तुम्ही नशा होणाऱ्या लाल मधाबद्दल ऐकलंय का? नसेल तर जाणून घ्या.

Red Honey: अनेकजण वापरत असलेल्या साध्या मधाबद्दल (Honey) तर सर्वांनाच माहिती असेल. मध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मधाचं सेवन केल्याने अनेक रोग दूर होतात, असं आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं. पण तुम्ही कधी लाल मधाबद्दल ऐकलं आहे का? असं म्हणतात की या मधामुळे दारुपेक्षाही जास्त नशा होते. जगातील सर्वात मोठ्या मधमाश्या (Honeybees) हे मध जमा करतात, ज्यांचं नाव आहे 'हिमालयन क्लिफ बी'. तर त्यांनी बनवलेल्या लाल मधाची खास वैशिष्ट्यं जाणून घेऊया.

विषारी फळांपासून गोळा केला जातो रस

लाल मध तयार करण्यासाठी हिमालयातील मधमाश्या (Himalayan Honeybees) विषारी फळांपासून रस गोळा करतात. हा मध अतिशय मादक आहे, यासोबतच यात अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. यामुळेच लाल मधाला जगभरात मोठी मागणी आहे. हे लाल मध मधुमेह (Diabetes) आणि उच्च रक्तदाबासाठी (Blood Pressure) फायदेशीर आहे. मात्र, याचे सेवन केल्याने होणाऱ्या नशेमुळे लाल मधाला जास्त मागणी आहे.

लाल मध कुठे मिळतं?

हे लाल मध नेपाळच्या (Nepal) दूरवरच्या भागात आढळते. या मधाची एक खास गोष्ट म्हणजे ते काढणं हे अत्यंत धोक्याचं काम आहे. सामान्य मध काढण्यापेक्षाही जिकीरीचं काम म्हणजे हे लाल मध काढणं. मोठ्या आकाराच्या मधमाश्यांमुळे ते जास्तच धोक्याचं बनतं. गुरुंग जमातीचे लोक मोठ्या कष्टाने ते काढतात. लाल मध (Red Honey) काढण्यासाठी आधी दोरीच्या साहाय्याने कित्येक फूट उंचावर ते चढतात, त्यानंतर मधमाश्यांना धुराच्या सहाय्याने पळवले जाते. एवढंच नाही तर संतप्त मधमाशांचा डंक देखील मधमाश्यांचं पोळं काढणाऱ्यांना सहन करावा लागतो.

या लाल मधाची नशा अ‍ॅबसिंथेसारखी

लाल मधाची नशा ही अ‍ॅबसिंथे (Absinthe) नावाच्या मादक पेयाप्रमाणे आहे. अ‍ॅबसिंथे हे असं मादक पेय (Alcoholic Drink) आहे ज्यावर अनेक देशांमध्ये बंदी (Banned) आहे. या अल्कोहोलिक पेयामुळे खूप नशा चढते, त्यामुळे अनेक देशात त्यावर बंदी आहे. तर, अशाच प्रकारची नशा चढवणारं हे लाल मध आहे. पण या लाल मधाचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका संभवू शकतो हेही तितकंच खरं आहे.

हेही वाचा:

Tobacco: तंबाखूचं सेवन करत होती आई, जन्मानंतर नवजात बाळामध्ये मिळाले निकोटिनचे अंश; डॉक्टरही चक्रावले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Embed widget