एक्स्प्लोर

Health Tips : तणावाशिवाय 'या' कारणांमुळे देखील दिसतात 'डार्क सर्कल'; काय आहेत यामागची कारणं आणि उपचार? जाणून घ्या

Health Tips : डार्क सर्कल सोप्या घरगुती उपायांनीही बरे होऊ शकतात आणि जीवनशैलीत किरकोळ बदल करूनही ते बरे करता येतात.

Cause of Dark Circle : डोळ्यांखाली काळी वर्तुळे (Dark Circle) येण्याचे कोणतेही विशिष्ट असे वय नसते. मनावर आणि शरीरावर अतिरिक्त ताण असल्यास किंवा कोणताही आजार असल्यास चेहऱ्याच्या सौंदर्यावर ग्रहणाप्रमाणे डार्क सर्कल्स येतात. यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच डार्क सर्कल्सची समस्या असते. जरी डार्क सर्कल्स चेहऱ्याचा लूक खराब करण्याशिवाय कोणतीही समस्या देत नाहीत. परंतु, ही स्वतःमध्ये अनेक समस्यांची लक्षणे आहेत, म्हणून त्यांना हलक्यात घेऊ नका किंवा त्याकडे दुर्लक्ष करू नका.

डार्क सर्कल सोप्या घरगुती उपायांनीही बरे होऊ शकतात आणि जीवनशैलीत किरकोळ बदल करूनही ते बरे होतात. तरीही अनेकवेळा असे घडते की त्यांच्यावर घरगुती उपचार किंवा औषधांचा काहीही परिणाम होत नाही. हे नेमके का घडते ते जाणून घ्या.

डार्क सर्कलची समस्या का उद्भवते?

कोणत्याही समस्येचे निराकरण जाणून घेण्यापूर्वी, आपण त्याची कारणे जाणून घेतली पाहिजेत. यामुळे उपचार शोधणे खूप सोपे होते. त्यामुळे आधी डार्क सर्कलची मुख्य कारणे कोणती ती पाहा.

  • खूप तणावाखाली असणे
  • झोपेचा अभाव
  • अन्नातील पौष्टिक कमतरता
  • धूम्रपान आणि अल्कोहोल व्यसन
  • वाढत्या वयामुळे
  • अनुवांशिक कारणांमुळे
  • शरीरात रक्ताची कमतरता
  • दीर्घ आजारामुळे
  • हार्मोनल बदलांमुळे
  • ऍलर्जीमुळे
  • डोळ्यांचा मेकअप न काढता झोपल्यामुळे

डार्क सर्कल कसे जातील?

तुमच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येण्याची कारणे तुम्हाला माहीत असतील. तर डार्क सर्कल्सवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ती कारणे दूर करण्यावर भर द्या. तसेच डोळ्यांखाली क्रीम, दही, मध, कोरफड जेल, व्हिटॅमिन-ई यासारख्या गोष्टी डार्क सर्कल्सवर लावा. जर घरगुती उपायांनी फरक पडला नाही तर जास्त वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या. 
जर तुम्हाला आनुवंशिक कारणांमुळे डार्क सर्कल्सची समस्या असेल तर तुम्ही त्यापासून सुटका करू शकत नाही. पण, नियमित काळजी आणि मेकअप करून तुम्ही त्यांना हायलाइट होण्यापासून रोखू शकता. 

डार्क सर्कल का बरे होत नाहीत?

  • औषधे घेतल्यानंतर आणि त्वचेची काळजी घेणारी उत्पादने वापरूनही जर डार्क सर्कल्स बरी होत नसतील, तर तुम्ही तुमचे हिमोग्लोबिन तपासले पाहिजे. 
  • ओव्हर-द-काउंटर औषधे घेणे टाळा. म्हणजेच मेडिकलमधूनच औषधे विकत घेऊन सेवन करू नका. अशा परिस्थितीत, आपण समस्येवर मात करण्यासाठी सामान्य औषध खरेदी करता, तर आपल्या शरीराला इतर काही पोषक तत्वांची आवश्यकता असू शकते. अशा परिस्थितीत, खरेदी केल्यानंतर खाल्लेले औषध अनेक वेळा प्रतिक्रिया देते आणि समस्या कमी होण्याऐवजी वाढू शकते.
  • जर तुम्ही औषधे आणि त्वचेची काळजी घेणारी उत्पादने दोन्ही वापरत असाल, परंतु डार्क सर्कल्स बरी होत नसतील, तर सर्वप्रथम तुमच्या झोपेचे तास पाहा. कारण झोप पूर्ण झाली नाही तर औषधे आणि प्रिस्क्रिप्शनचा परिणाम दिसून येत नाही.
  • औषधे आणि उपाय करूनही डार्क सर्कल्स बरी न होण्याचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे तुमच्या आहारातील कमतरता त्यामुळे त्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Vertigo : वर्टिगो हा आजार नेमका कशामुळे होतो? वाचा आजाराची लक्षणं आणि उपचार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget