Drinking Hot Water Benefits : गरम पाण्याने होतील आरोग्याचे समस्या दूर; जाणून घ्या फायदे
Drinking Hot Water Benefits : गरम पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. जाणून घ्या गरम पाणी प्यायल्याने आरोग्याला कोणते फायदे होतील.
Drinking Hot Water Benefits : बहुतेक लोकांना सकाळी उठल्यानंतर किंवा दिवसभर गरम पाणी पिण्याची सवय असते. फक्त हिवाळ्यातच नाही तर उन्हाळ्यातही गरम पाणी पितात. गरम पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. काही लोक वजन कमी करण्यासाठी ते पितात. मात्र, अनेक फायदे असूनही, गरम पाणी संतुलित आहार आणि व्यायामाची जागा घेऊ शकत नाही. यामुळेच फक्त गरम पाणी आरोग्यासाठी पुरेसे नाही. आहाराकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. काही लोक पाणी जास्त गरम केल्यानंतर पितात. मात्र, आरोग्याच्यादृष्टीने हे चांगले नाही. थोडं गरम पाणी पिण्याने तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदे मिळू शकतात.
>> गरम पाणी पिण्याचे फायदे
> पचनास मदत होते
जेवल्यानंतर अथवा काही खाल्ल्यानंतर गरम पाणी प्यायल्याने अन्न लवकर पचण्यास मदत होते. गरम पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. पोटाचे बहुतांश आजार दूषित पाण्यामुळे होतात. पाणी गरम करून थंड करून प्यायल्यास बहुतेक आजार बरे होतात.
> हायड्रेशन सुधारते
गरम पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. दुसऱ्या शब्दांत, ते आपल्या शरीराला डिटॉक्स करते. शिवाय, ते तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवते.
> वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
अनेक आरोग्य तज्ज्ञ अन्न खाल्ल्यानंतर गरम पाणी पिण्यास सांगतात. हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. बरेच लोक सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा गरम पाणी देखील घेतात. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की अन्न खाण्यापूर्वी गरम पाणी प्यायल्याने चयापचय प्रक्रिया 32 टक्क्यांनी वाढते.
> मासिक पाळीतील वेदना कमी करते
अन्न खाल्ल्यानंतर गरम पाणी प्यायल्याने गर्भाशयात रक्त प्रवाह वाढतो. ज्यामुळे स्नायूंना आराम मिळतो. गरम पाणी रक्तवाहिन्या विस्तारून शरीरातील रक्त प्रवाह वाढवण्यास मदत करते.
> सर्दी खोकल्यापासून आराम
सर्दी असल्यास, गरम पाणी पिणे हा तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो. गरम पाणी छातीत कफ जमा होण्यापासून रोखते. याच्या सेवनानेही घसा चांगला राहतो.
> केसांसाठी फायदेशीर
नियमित गरम पाणी प्यायल्याने केस चमकदार होतात आणि त्यांची वाढ वाढते.
( विशेष सूचना : ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. आहारतज्ज्ञ, डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा )
इतर महत्त्वाची बातमी :