एक्स्प्लोर
...म्हणून केकवरील मेणबत्यांवर फुंकर मारु नये: रिसर्च
वाढदिवसाचा केक कापताना आपण बऱ्याचदा त्यावर लावलेल्या मेणबत्त्या हमखास विझवतो. पण नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार, केकवरील मेणबत्या विझवल्यास संपूर्ण केकवर जीवाणू पसरत असल्याचं समोर आलं आहे.
मुंबई: वाढदिवसाचा केक कापताना आपण बऱ्याचदा त्यावर लावलेल्या मेणबत्त्या हमखास विझवतो. पण नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार, केकवरील मेणबत्या विझवल्यास संपूर्ण केकवर जीवाणू पसरत असल्याचं समोर आलं आहे.
साऊथ कॅरोलिनाच्या क्लेमसन विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, मेणबत्या विझवताना बऱ्याचदा थुंकी केकवर पसरण्याची बरीच शक्यता असते. त्यामुळे 1400% जीवाणू त्या केकवर बसण्याची शक्यता असते.
हा रिसर्च करणारे डॉ डाव्हसन आणि त्याच्या टीम ही माहिती समोर आल्यानं आश्चर्यचकीत झाले. याबाबत रिसर्च करत असताना त्यांना ही धक्कादायक माहिती मिळाली.
यामुळे डॉ, डाव्हसन यांच्या मते, यापुढे केकवर मेणबत्या लावणंच बंद करायला हवं.
पण अनेक वैज्ञानिकांच्या मते, 'मनुष्याचा तोंडात अनेक जीवाणू असतात. पण त्यातील सगळ्याच घातक नसतात. त्यामुळे ही समस्या फार गंभीर असल्यास यावर नक्कीच विचार केला गेला असता.'
डॉ. डाव्हसन यांच्या मते, जर कोणी आजारी व्यक्ती मेणबत्या विझवून केक कापत असेल तर असा केक खाणं शक्यतो टाळावं.
(सूचना: हा एक रिसर्च आहे. एबीपी माझानं त्याची पडताळणी केलेली नाही. दरम्यान, याबाबत कोणताही सल्ला हवा असल्यास आपल्या डॉक्टारांना जरुर भेटा.)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
राजकारण
पुणे
Advertisement