Blood Pressure Control : योगासन करुन ब्लड प्रेशर कंट्रोल करा, जाणून घ्या कोणत्या योगासनांमुळे होईल फायदा
Yoga For Bp Problem : योग करुन तुम्ही रक्तदाब नियंत्रणात आणू शकता. औषधासोबत तुम्ही दररोज योग करा. यामुळे शरीर शांत होण्यास मदत होऊन ब्लड प्रेशर नियंत्रणात येईल.
Yoga For Blood Pressure Control : सध्या अनेक जण ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाबाच्या (Blood Pressure) समस्यांनी त्रस्त आहेत. बहुतेकांना उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. सध्याच्या व्यस्त जीवनामुळे अनेक जणांना बीपीचा त्रास होतो. काहींना वाढत्या वयामुळे, मुत्रपिंडाचे विकार, अनुवांशिक, लठ्ठपणा किंवा काही इतर कारणांमुळे बीपीचा त्रास होतो. आधी वयाच्या 50 वर्षानंतर ही समस्या व्हायची. पण आता बदललेल्या जीवनशैलीमुळे रक्तदाबाचा आजार फार कमी वयातच होत असल्याचं दिसून येत आहे. तरुणाईलाही ब्लड प्रेशर संदर्भातील समस्यांना सामोरं जावं लागत आहे. योगासनांद्वारे (Yoga) तुम्ही रक्तदाबाच्या समस्यांवर नियंत्रण मिळवू शकता.
योगासनं उच्च रक्तदाब नियंत्रित करा
विरासन : विरासन हे सर्वात फायदेशीर मानलं जातं. याच कारण म्हणजे उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी श्वासोच्छ्वासाचा समावेश असलेला प्रत्येक योग चांगला असतो. विरासन केल्यानं रक्तदाब नियंत्रणात राहतो. मज्जासंस्था सुरळीत राहते आणि बऱ्याच तणाव कमी होतो.
कसे करायचे
- गुडघे टेकून जमिनीवर बसा.
- दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा.
- घोट्यांमध्ये आपले नितंब ठेवा आणि गुडघ्यांमधील अंतर कमी करा.
- नाकावाटे श्वास आतमध्ये खेचा.
- 30 सेकंदांनी श्वास बाहेर सोडा. विश्रांती घ्या.
शवासन : शवासन केल्याने उच्च रक्तदाबाची पातळी नियंत्रमत होते. शरीराला शांत होते.
कसे करायचे
- पाठीवर झोपा. (योगा मॅटचा वापर करा )
- डोळे बंद करा.
- पाय पसरवा.
- पायांना विश्रांती द्या.
- दोन्ही हात शरीराच्या दोन्ही बाजूंना स्पर्श न करता ठेवा.
- हळुहळू तळवे पसरवा आणि संपूर्ण शरीराला आराम द्या.
- खोल आणि हळू श्वास घ्या आणि 30 सेकंद धरून ठेवा, नंतर आराम करा.
बालासन : बालासन केल्यानं रक्तदाब नियंत्रणात राहतो, शरीराला आराम मिळतो. तसेत यावेळी नितंब आणि मणक्याच्या हाडांनाही फायदा होतो.
कसे करायचे
- वज्रासनात योगा मॅटवर बसा.
- हळू श्वास घ्या आणि हात डोक्याच्या वरच्या बाजूला वर न्या.
- हळूहळू श्वास सोडा आणि पुढे वाकून कपाळ जमिनीवर ठेवा.
- हे करताना श्वासावर लक्ष केंद्रीत करा.
- हे 30 सेकंद करा, त्यानंतर शरीराला विश्रांती द्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत
महत्वाच्या बातम्या :
- Curd Eating Tips : आयुर्वेदिक पद्धतीने दही खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव होईल
- Orange Juice : लठ्ठपणा टाळायचा असेल तर संत्र्याचा रस पिणं बंद करा, 'हे' आहे कारण
- Health Tips : अंगावर खाज येत असेल तर करा 'हे' घरगुती उपाय; लगेच मिळेल आराम
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )