एक्स्प्लोर

World Senior Citizen's Day 2022 : डोळ्यांशी संबंधित आजारांचा सामना करणाऱ्या ज्येष्ठांनी अशी घ्यावी काळजी! वाचा खास टिप्स...

World Senior Citizen's Day 2022 : वयोवृद्ध व्यक्तींमध्ये नजर कमजोर होण्याची समस्या सर्रास आढळून येते. दृष्टी गमावण्याचा वयोवृद्ध व्यक्तींच्या जीवनमानाच्या दर्जावर विपरित परिणाम होतो.

World Senior Citizen's Day 2022 : वयोवृद्ध व्यक्तींमध्ये नजर अधू होण्याची समस्या सर्रास आढळून येते. जगभरात 25 कोटी लोक दृष्टीदोषाचा सामना करत असून, त्यापैकी 80 टक्‍के लोक 50 वर्षांपुढील वयोगटातील आहेत. दृष्टी गमावण्याचा वयोवृद्ध व्यक्तींच्या (World Senior Citizen's Day 2022 ) जीवनमानाच्या दर्जावर विपरित परिणाम होतो व त्यातून मृत्यू देखील संभवू शकतो. नेत्रपटलांच्या आजारांविषयी अर्थात रेटिनल आरोग्याविषयी जागरुकतेचे प्रमाण अत्यल्प असल्याने आणि उपचारांच्या अभावामुळे नेत्रपटलाचे आजार असलेल्या वयोवृद्ध व्यक्तींना नैराश्य आणि चिंता अशा मनोविकारांचा धोका अधिक प्रमाणात असतो.

रेटिनाच्या आजारांमुळे केवळ अस्वस्थता येत नाही, तर त्यामुळे एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीचे आयुष्य कायमचे आणि संपूर्णपणे थांबून जाण्याची शक्यता असते. म्हणूनच, नजर गमावण्याचा धोका टाळण्यासाठी रेटिनाची योग्य देखभाल करणे आणि रेटिनाचे आरोग्य जपणे या गोष्टींकडे पहिल्यांदा लक्ष दिले पाहिजे.

वाढत्या वयानुसार उद्भवणाच्या डोळ्यांच्या सर्वसाधारण समस्या

डॉ. नीतिन प्रभुदेसाई यांच्या माहितीनुसार, 10 ते 15 टक्‍के ज्येष्ठ नागरिकांमध्ये रेटिनाशी निगडित समस्या उद्भवतात. मात्र, त्यांची तीव्रता वेगवेगळी असते. यामध्ये एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन, डायबेटिक मॅक्युरल एडेमा, व्हॅस्क्युलर ऑक्लुजन्स, रेटिनल डिटॅचमेंट या समस्या सरसकट आढळून येतात. म्हणूनच आजाराचे सुरुवातीच्या टप्प्यावरच निदान होण्यासाठी व तो बळावू नये यासाठी वर्षातून एकदा डोळे आणि रेटिनाची तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. वयोवृद्ध व्यक्तींची काळजी घेणाऱ्या व्यक्तींनीही त्यांच्या दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेवायला हवे. त्यांच्या दृष्टीमध्ये काही बदल आढळून आल्यास ताबडतोब नेत्रविकारतज्ज्ञांकडून त्यांची तपासणी करून घेतली पाहिजे.’

वाढत्या वयामध्ये नजर चांगली ठेवण्यासाठी काही उपाय

वयोवृद्ध व्यक्तींच्या बाबतीत नजर कमकुवत होण्याची समस्या ही वाढत्या वयाचा अटळ भाग म्हणून दुर्लक्षली जाते. पण जागरुकता, उपचार आणि शिस्त यांच्या मदतीने या समस्यांचे योग्य व्यवस्थापन करता येते. वयोवृद्ध व्यक्तींची दृष्टी जपण्यासाठीचे काही खात्रीचे उपाय...

  • नेत्रतपासणी टाळू नका

आपल्या डोळ्यांच्या तपासणीसाठी दृष्टीमितिज्ञ अर्थात ऑप्टोमेट्रिस्ट किंवा नेत्रविकारतज्ज्ञ अर्थात ऑप्थॅल्मोलॉजिस्ट यांना नियमितपणे भेट देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. समस्येचे निदान लवकर झाले, तर तुमच्या डोळ्यांना संरक्षण तर मिळेलच पण दृष्टी गमावण्याचा धोका टाळण्यासही मदत होईल. खरेतर कॉन्टॅक्ट लेन्स किंवा चष्मा न घालणाऱ्या, नजर चांगली असलेल्या ज्येष्ठांनीही नियमितपणे नेत्रतपासणी करून घ्यायला हवी. यामुळे संसर्गास प्रतिबंध होऊ शकेल. तसेच, कालपरत्वे बळावत जाणाऱ्या आजारांचे सुरुवातीच्या टप्प्यावरच निदान होऊ शकेल.

  • सांगितलेल्या उपचारांचे काटेकोर पालन करा

डोळ्यांचा कोरडेपणा, अश्रूपिंडांमध्ये अडथळा निर्माण होणे किंवा एएमडी आणि डीएमईसारखे कालपरत्वे बळावणारे आजार यापैकी कोणत्या समस्येवरील उपचारांची तुम्हाला गरज आहे, हे विशेषज्ज्ञ ठरवतात. एएमडीच्या समस्येवर औषधांच्या व लेझर थेरपीच्या मदतीने प्रभावी उपचार शक्य आहेत आणि रुग्णांना दैनंदिन वापरासाठी कमी लो व्हिजन एड्स अर्थात अधू नजरेला आधार देणाऱ्या उपकरणांचा वापरही करता येईल.

  • आपला रक्तदाब, ग्लुकोजची पातळी आणि कॉलेस्ट्रॉल यांच्यावर नियमितपणे देखरेख ठेवा

वरकरणी रक्तदाब आणि कॉलेस्ट्रॉल या फक्त हृदय आणि रक्तवाहिन्यांशी निगडित समस्या वाटतात, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यास त्यातून तुमच्या डोळ्यांसह इतर महत्त्वाच्या इंद्रियांची हानी होऊ शकते. वयोवृद्ध व्यक्तींमध्ये मधुमेह हा मूकपणे रेटिनाची हानी घडवून आणत असतो. असे असले तरीही आज रक्तातील ग्लुकोजची पातळी सातत्याने तपासण्यासाठी सेन्सर यंत्रणा बसवलेली कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटरींग उपकरणे उपलब्ध आहेत. या उपकरणांमुळे ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राखता येऊ शकते. आपला रक्तदाब, कॉलेस्ट्रॉल आणि ग्लुकोज निरोगी पातळीवर राखल्यास रेटिनाच्या आरोग्याचीही हमी मिळेल.

  • डोळ्यांना सतत जपा

तुम्हाला फोटोसेन्सिटिव्हिटी म्हणजे प्रकाशाचा त्रास होण्याची समस्या नसली तरीही आपले डोळे सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट (यूव्‍ही) किरणोत्सर्गाच्या संपर्कात येऊ नयेत, यासाठी उघड्या डोळ्यांनी सूर्यप्रकाशाकडे पाहणे टाळायला हवे. यूव्‍ही किरणांमुळे रेटिनाची हानी होते आणि बहुतांश लोकांना खूप उशीर होईपर्यंत ही गोष्ट लक्षात येत नाही. तेव्हा, घराबाहेर जाताना यूव्‍ही प्रतिबंधक कोटिंग असलेले सनग्लासेस वापरा किंवा तुम्ही आधीच रेटिना किंवा डोळ्यांवरील उपचार घेत असाल तर तुमच्या विशेषज्ज्ञांनी सांगितलेला चष्मा वापरा.

  • अधिक आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा स्वीकार करा

तुम्हाला रेटिनाशी निगडित काही विशिष्ट आजारांची लागण आधीच झाली असेल तर तुम्ही धूम्रपान आवर्जून टाळले पाहिजे. धूम्रपानामुळे नेत्रविकार जडतात तसेच अधिक वेगाने दृष्टीहीनता येते. तुमच्या रेटिनाचे आरोग्य जपण्यामध्ये तुमच्या आहाराची महत्त्वाची भूमिका असते. अँटिऑक्सिडंट्स आणि अत्यावश्यक खनिजे असणाऱ्या अन्नपदार्थांचा आहरात समावेश करा, जे रेटिनाला हानी पोहोचवणाऱ्या फ्री रॅडिकल्सशी लढा देऊ शकतील. फळे आणि पालेभाज्या अंडी, रेड मीट आणि मासे खा. अक्रोड, थंड पाण्यातील मासे आणि अळशीच्या बिया यामध्ये ओमेगा 3 असते, जे रेटीनाचे आरोग्य सुधारते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)

महत्वाच्या बातम्या : 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांना घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांना घेतला कुत्र्याने चावा 
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Ration Supply : ठप्प रेशन, लोकांना टेन्शन; राज्यात आणखी दोन दिवस धान्य पुरवठा रखडणारSharad Pawar Ajit Pawar : पवारांमध्ये मनोमिलन, बदलणार राजकारण?  की भाजपचा डाव, दादांना टार्गेट?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 5 PM : 13 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांना घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांना घेतला कुत्र्याने चावा 
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
कहरच... ZP शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्स, बिभत्स नृत्याविष्कार; कारवाईची मागणी
कहरच... ZP शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्स, बिभत्स नृत्याविष्कार; कारवाईची मागणी
Manoj Parmar : आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
Uddhav Thackeray : ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
Embed widget