(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Physical Therapy Day 2022 : आज जागतिक शारीरिक थेरपी दिवस; जाणून घ्या यामागचा इतिहास आणि महत्त्व
World Physical Therapy Day 2022 : फिजिओथेरपिस्टच्या आरोग्य सेवेतील योगदानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांना शारीरिकरित्या सक्रिय राहण्यासाठी जागतिक शारीरिक थेरपी दिवस साजरा केला जातो.
World Physical Therapy Day 2022 : दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी जागतिक शारीरिक थेरपी दिवस (World Physical Therapy Day) संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. फिजिओथेरपिस्टच्या आरोग्य सेवेतील योगदानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांना शारीरिकरित्या सक्रिय राहण्यासाठी आणि चांगले आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी जागतिक शारीरिक थेरपी (PT) दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल जगभरातील फिजिओथेरपिस्टचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
जागतिक शारीरिक थेरपी दिवस थीम (World Physical Therapy Day Theme 2022) :
दरवर्षी जागतिक शारीरिक थेरपी दिनानिमित्त जागरूकता निर्माण करण्यासाठी एक थीम (Theme)फॉलो केली जाते. त्यानुसार यावर्षीची थीम 'ऑस्टियोआर्थरायटिस' (Osteoarthritis) आहे. गेल्या वर्षी ‘Rehabilitation and Long COVID’ ही थीम होती. जागतिक शारीरिक थेरपी दिवस पहिल्यांदा 8 सप्टेंबर 1996 रोजी साजरा करण्यात आला.
जागतिक शारीरिक थेरपी दिनाचा इतिहास (World Physical Therapy Day History 2022) :
1996 मध्ये वर्ल्ड कॉन्फेडरेशन ऑफ फिजिकल थेरपीने (WCPT) 8 सप्टेंबर हा जागतिक शारीरिक थेरपी दिवस म्हणून साजरा केला. या तारखेची स्थापना डब्ल्यूसीपीटीने 1951 मध्ये केली होती. जगभरातील अनेक अहवालांनुसार, जागतिक शारीरिक थेरपी दिनाच्या उपक्रमांचा व्यवसायाच्या व्यक्तिरेखेवर सकारात्मक प्रभाव पडतो.
जागतिक शारीरिक थेरपी दिनानिमित्त (World Physical Therapy Day 2022) शारिरीक थेरपी घेतल्यामुळे शरीराला नेमके कोणते फायदे होतात हे जाणून घ्या.
शारीरिक थेरपीचे काही फायदे :
- वेदना कमी करणे किंवा दूर करणे
- शस्त्रक्रिया टाळणे
- सुधारित हालचालीसाठी
- खेळाच्या दुखापतीतून बरे होणे किंवा त्यावर मात करण्यासाठी
- वयोमानाशी संबंधित वैद्यकीय समस्या देखील याद्वारे कमी केल्या जाऊ शकतात.
- मधुमेह आणि रक्तवहिन्यासंबंधी स्थिती दूर करण्यासाठी
- हृदय आणि फुफ्फुसाचे आजारांपासून संरक्षण करण्यासाठी
- महिलांचे आरोग्य जपण्यास मदत करण्यासाठी
महत्वाच्या बातम्या :
- Heart Health Tips : हृदयविकाराचा झटका साधारण किती वेळा येऊ शकतो? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
- Fatty Lever: फॅटी लिव्हर आणि टाईप-2 मधुमेह आजारात संबंध; आयआयटी मंडीचे महत्त्वाचे संशोधन
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )