World Patient Safety Day 2023 : आज आहे 'जागतिक रुग्ण सुरक्षा दिन'; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
World Patient Safety Day 2023 : रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी जागरूकता निर्माण करणे हे या दिनाचं मुख्य उद्देश आहे.
World Patient Safety Day 2023 : आज जागतिक रुग्ण सुरक्षा दिन (World Patient Safety Day). जागतिक रुग्ण सुरक्षा दिन जागतिक स्तरावर 17 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी जागरूकता निर्माण करणे आणि आरोग्यसेवा अधिक सुरक्षित करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतिपादन करणे हे या दिनाचं मुख्य उद्देश आहे. हा दिवस रुग्ण, कुटुंब, काळजीवाहू समुदाय, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवा यांच्यासाठी साजरा केला जातो.
जागतिक रुग्ण सुरक्षा दिनाचा उद्देश (World Patient Safety Day Significance 2023) :
जागतिक रुग्ण सुरक्षा दिन साजरा करण्यामागे काही महत्त्वाचे उद्दिष्ट आहे यापैकी रुग्णांच्या सुरक्षिततेबद्दल जागतिक समज वाढविणे हा या दिवसामागचा सर्वात मोठा उद्देश आहे. यामध्ये रुग्णांच्या आरोग्यसेवेचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांचे नुकसान कमी करण्यासाठी, सार्वजनिक सहभाग वाढविण्यासाठी जागतिक कृतींना प्रोत्साहन देणे देखील समाविष्ट आहे. जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस साजरा करण्यामागील कारण म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेच्या महत्त्वशी संबंधित वस्तुस्थिती बद्दल जागतिक जागरुकता वाढविणे आहे.
जागतिक रुग्ण सुरक्षा दिनाचा इतिहास (World Patient Safety Day History 2023) :
जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस सर्वात प्रथम 17 सप्टेंबर 2019 रोजी WHOने आपल्या ठरावावर साजरा करण्याची मान्यता दिली. 25 मे 2019 रोजी 72 व्या जागतिक आरोग्य संमेलनात हा ठराव मंजूर करण्यात आला. आणि तेव्हापासून दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस जागतिक रूग्ण सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो.
जागतिक रुग्ण सुरक्षा दिनाची थीम (World Patient Safety Day Theme 2023) :
दरवर्षी, जागतिक रुग्ण सुरक्षा दिनाची विशिष्ट थीम ठेवली जाते. या थीमच्या माध्यमातून रूग्णांच्या सुरक्षिततेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात येतो. जसे की, औषधांची सुरक्षा, आरोग्य सेवा कर्मचार्यांची सुरक्षा आणि रूग्ण संलग्नता इ. जागतिक रूग्ण सुरक्षा दिनाची यावर्षीची थीम "रुग्णांच्या सुरक्षेसाठी रुग्ण", आरोग्य सेवेच्या सुरक्षेसाठी रुग्ण (“Engaging patients for patient safety”) अशी आहे. या थीमच्या माध्यमातून जागतिक स्तरावर जनजागृती केली जाते.
आज अनेक ठिकाणी रूग्णालयात रूग्णांची अवस्था आपण पाहतो. त्यांच्या सुरक्षिततेची, स्वच्छतेची नीट काळजी घेतली जात नाही. अशा वेळी जागतिक रुग्ण सुरक्षा दिनाच्या माध्यमातून यावर प्रकाश टाकला जातो.
महत्त्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )