women Health: टॅम्पॉन आणि मेन्स्ट्रुअल कपमध्ये फरक काय? मासिक पाळीत काय सोयीस्कर?
पाळीत होणारा रक्तस्राव शोषण्यासाठी अनेकदा सॅनेटरी नॅपकीन, टॅम्पॉन हे एकदा वापरण्यासारखे आहेत. कोणता पर्याय चांगला?
Women Health: मासिक पाळीत अनेकींना खूप रक्तस्राव जातो. त्यामुळे साध्या सॅनेटरी नॅपकिनला पंसती देताना दिसतात. पाळीच्या कालावधीत वापरण्यासाठी महिलांना विविध साधने बाजारात उपलब्ध आहेत. टॅम्पॉन किंवा मेन्स्ट्रुअल कपसारख्या साधनांमध्ये रक्तस्राव अधिक शोषण्याची क्षमता असते.त्वचेलाही फार त्रास याने होत नसल्याचं तश्र सांगतात. पण यात नेमका फरक काय? कसं वापरतात टॅम्पॉन किंवा मेस्ट्रूअल कप?
पाळीत होणारा रक्तस्राव शोषण्यासाठी अनेकदा सॅनेटरी नॅपकीन, टॅम्पॉन हे एकदा वापरण्यासारखे तर कापडी पॅड ही पून्हा वापरता येत नाहीत. अनेकदा आर्थिकदृष्टय़ा न परवडणे, उपलब्धता नसणे किंवा पॅड्स विकत घ्यायला संकोच वाटणे आदी कारणांमुळे काही ठिकाणी अजूनही मुली आणि स्त्रिया पाळीच्या दिवसांत जुने कपडे वापरतात. पण नीट काळजी नग घेतल्यानं योनीमार्गावर जंतूसंसर्ग होण्याची शक्यता असते. याला पर्याय म्हणून टॅम्पॉन हे चांगले साधन आहे.
टॅम्पॉन म्हणजे काय? हे वापरल्यानं काही ईजा होत नाही ना?
तज्ञांच्या म्हणण्यानुसार, टॅम्पॉन म्हणजे एक प्रकारे कापसाचा गोळा. योनीच्या आतल्या बाजूस घालून हे वापरात येतात. हे एकदाच वापरता येण्यासारखे असून रक्तस्त्रावानुसार दर दोन ते तीन तासांनी बदलणे आवश्यक आहे. आठ तासांहून अधिक काळ टॅम्पॉन न वापरण्याचा सल्ला देण्यात येतो. अधिक काळ टॅम्पॉन योनीमार्गात राहिल्यानं योनी कोरडी होऊन जंतूंचा संसर्ग वाढू लागतो. याचा फायदा म्हणजे, आपल्याला कुठेही मुक्तपणे वावरता येतं.
मेन्स्टूअल कप म्हणजे काय? कसा वापरतात?
सॅनिटरी नॅपकीन किंवा टॅम्पॉनपेक्षा अधिक रक्तस्राव शोषला जाणारा आणि आरोग्यदृष्टया फायदेशीर आणि पर्यावरणपूरक हा प्रकार आहे.योनीच्या आत ठेवण्यात येणाऱ्या या कपमध्ये रक्तस्राव शोषला जात नाही तर साठवला जातो. काही कालावधीनंतर हा कप काढून त्यात साठलेला स्रावची शौचालयात विल्हेवाट लावली जाते. बारा तासापर्यंत न बदलता या कपचा वापर करणे शक्य आहे. एक कप अनेक वर्षे वापरता येत असल्याने हा पर्याय परवडणाराही आहे. पुनर्वापर होणारा कप असेल तर नियमित स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. कप काढताना नीट काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
हेही वाचा:
Swim During Pregnancy: गरोदरपणात स्विमिंग करणं कितपत सुरक्षित आणि किती फायदेशीर?
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )