BJP Is The Richest Political Party In India : भाजप देशातील गर्भश्रीमंत राजकीय पक्ष, 7 हजार कोटींहून अधिक रोख कॅश अन् बँक बॅलन्स; तुलनेत काँग्रेसची डाळ सुद्धा शिजणार नाही, इतरांनी नादही करु नये!
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडे तब्बल 7 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त (7113.80 कोटी रुपये) रोख आणि बँक बँलन्स आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसकडे केवळ 857.15 कोटी रुपये आहेत.
![BJP Is The Richest Political Party In India : भाजप देशातील गर्भश्रीमंत राजकीय पक्ष, 7 हजार कोटींहून अधिक रोख कॅश अन् बँक बॅलन्स; तुलनेत काँग्रेसची डाळ सुद्धा शिजणार नाही, इतरांनी नादही करु नये! The ruling BJP spent Rs 1754 crore nearly thrice as much as principal opponent Congress Rs 619 crore in 2023 24 when the country witnessed the 18th General Election BJP Is The Richest Political Party In India : भाजप देशातील गर्भश्रीमंत राजकीय पक्ष, 7 हजार कोटींहून अधिक रोख कॅश अन् बँक बॅलन्स; तुलनेत काँग्रेसची डाळ सुद्धा शिजणार नाही, इतरांनी नादही करु नये!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/29/efc795b295b73b5368a60eb6a7e38b621738121997664736_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
BJP Is The Richest Political Party In India : गेल्यावर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपने तब्बल 1 हजार 754 कोटी रुपये खर्च केले आहेत. प्रमुख विरोधी काँग्रेसने 619 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या एकूण संपत्तीच्या दुप्पट आणि लोकसभेला जवळपास तिप्पट खर्च भाजपने लोकसभा निवडणुकीवर केला आहे. राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या आणि मंगळवारी निवडणूक आयोगाने प्रकाशित केलेल्या खर्चाच्या विवरणातून 31 मार्च 2024 पर्यंत भाजपच्या खात्यात 7113 कोटी रुपये शिल्लक आहेत. काँग्रेसकडे फक्त 857 कोटी रुपये असून भाजपकडे आठपट शिल्लक आहे.
भाजपकडे 7 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख आणि बँक बँलन्स
देशातील विविध राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगाला मिळालेल्या आकडेवारीनुसार, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडे तब्बल 7 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त (7113.80 कोटी रुपये) रोख आणि बँक बँलन्स आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसकडे केवळ 857.15 कोटी रुपये आहेत. भाजपकडे काँग्रेसच्या तुलनेत सुमारे 8.5 पट जास्त रोकड आणि बँक शिल्लक आहे. आकडेवारीनुसार, 2023-24 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सुमारे 1700 कोटी रुपये खर्च केले होते. हा खर्च 2022-23 च्या खर्चापेक्षा 60 टक्के जास्त आहे. त्या वर्षी पक्षाने सुमारे 1000 कोटी रुपये खर्च केले होते. त्या तुलनेत काँग्रेसने 2023-24 च्या लोकसभा निवडणुकीत सुमारे 600 कोटी रुपये खर्च केले. 2022-23 च्या खर्चापेक्षा ही रक्कम जवळपास 3 पट जास्त आहे. त्या वर्षी काँग्रेसने सुमारे 200 कोटी रुपये खर्च केले होते.
भाजपला गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 पट देणगी मिळाली
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाजपला जवळपास 2 पट देणगी मिळाली आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालानुसार, 2023-24 मध्ये भाजपला इलेक्टोरल बाँड्सद्वारे 1685.69 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. गेल्या वर्षी 2022-23 मध्ये ही रक्कम 1294.15 कोटी रुपये होती. या काळात पक्षाला 2042.75 कोटी रुपयांच्या इतर पावत्याही मिळाल्या. तर गेल्या वर्षी तो 648.82 कोटी रुपये होता. त्याच वेळी, काँग्रेसला 2023-24 मध्ये एकूण 1225.11 कोटी रुपयांची देणगी मिळाली. त्यापैकी 828.36 कोटी रुपये इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून मिळाले आहेत. इलेक्टोरल बाँड्सवर आता सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे.
भाजपने जाहिरातींवर सुमारे 600 कोटी रुपये खर्च केले
भाजपने यावर्षी जाहिरातींवर 591 कोटी रुपये खर्च केले. यामध्ये 434.84 कोटी रुपये इलेक्ट्रॉनिक जाहिरातींवर तर 115.62 कोटी रुपये छापील जाहिरातींवर खर्च करण्यात आले. 2023-24 च्या निवडणुकीत पक्षाच्या नेत्यांसाठी हेलिकॉप्टर आणि विमानांवर 174 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, तर 2022-23 मध्ये ते 78.23 कोटी रुपये होते. पक्षाने यावर्षी आपल्या उमेदवारांना 191.06 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली. तर गेल्या वर्षी ही रक्कम 75.05 कोटी रुपये होती. भाजपने 84.32 कोटी रुपये सभांवर खर्च केले. मोर्चा, रॅली, आंदोलन आणि कॉल सेंटरवर 75.14 कोटी रुपये खर्च झाले.
भारत जोडो यात्रा 2.0 वर सुमारे ₹50 कोटी खर्च झाले
काँग्रेसने इलेक्ट्रॉनिक जाहिरातींवर 207.94 कोटी रुपये आणि छापील जाहिरातींवर 43.73 कोटी रुपये खर्च केले. पक्षाने विमाने आणि हेलिकॉप्टरवर 62.65 कोटी रुपये आणि उमेदवारांना 238.55 कोटी रुपये आर्थिक मदतीसाठी खर्च केले. काँग्रेसने प्रचारावर 28.03 कोटी रुपये आणि सोशल मीडियावर 79.78 कोटी रुपये खर्च केले. पक्षाने आपल्या लेखापरीक्षण अहवालात म्हटले आहे की 2023-24 मध्ये माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दुसऱ्या भारत जोडो यात्रेवर 49.63 कोटी रुपये खर्च केले. पहिल्या भारत जोडो यात्रेवर 71.84 कोटी रुपये खर्च करण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)