(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Liver Health : यकृताच्या आरोग्याची काळजी घेणे का महत्त्वाचे? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात...
Liver Health : भारतामध्ये हेपेटायटीस बीचे (Hepatitis B) प्रमाण मध्यवर्ती ते उच्च आहे आणि तीव्र HBV संक्रमित रुग्णांची संख्या अंदाजे 40 कोटी आहे.
Liver Health : भारतामध्ये हेपेटायटीस बीचे (Hepatitis B) प्रमाण मध्यवर्ती ते उच्च आहे आणि तीव्र HBV संक्रमित रुग्णांची संख्या अंदाजे 40 कोटी आहे. ही संख्या जागतिक भाराच्या अंदाजे 11 टक्के आहे. भारतात तीव्र HBV संसर्गाचे प्रमाण सुमारे 3 ते 4 टक्के आहे. याव्यतिरिक्त, प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीतील आकडेवारीनुसार, असे आढळून आले की 1% लोक HbsAg चाचणीमध्ये बाधित आढळले आहेत. ही चाचणी हिपॅटायटीस बी विषाणूसाठी प्रतिजन चाचणी आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा तज्ज्ञ अमोल नायकवडी यांनी नियमित तपासणी चाचण्यांदरम्यान ही माहिती गोळा केली आहे.
यकृत एंझाइम्स आणि यकृताच्या योग्य कार्यास मदत करणार्या प्रथिनांच्या आकडेवारीवरून असे दिसून आले की, 2% स्त्रिया आणि 9% पुरुष असामान्य श्रेणीत होते. बिलीरुबिनचे प्रमाण मोजणाऱ्या दुसऱ्या यकृत कार्य चाचणीत 1% स्त्रियांमध्ये आणि 6% पुरुषांमध्ये असामान्य पातळी दिसून आली. बिलीरुबिन हे कावीळचे सूचक असलेले रक्तातील एक पिवळसर रंगद्रव्य असते.
हेपेटायटीसची कारणे काय आहेत?
- अल्कोहोल आणि इतर विषारी पदार्थ : मद्यपानाचा अतिरेक यकृताला सूज आणून हानी पोहोचवू शकतो. यकृताच्या पेशींना सहसा अल्कोहोलमुळे हानी पोहोचते. यामुळे अखेरीस अपरिवर्तनीय हानी होऊ शकते, यकृताच्या ऊती घट्ट होतात किंवा डाग पडतात (सिरॉसिस) आणि यकृत निकामी होऊ शकते.
- दाहक प्रतिक्रिया : काहीवेळा, रोगप्रतिकारक यंत्रणा यकृतावर हल्ला करते, कारण ती त्याला धोकादायक मानते. यामुळे सतत जळजळ होते, जी किरकोळ ते गंभीर असू शकते आणि वारंवार यकृताचे कार्य बिघडते. पुरुषांपेक्षा स्त्रियांना याचा अनुभव येण्याची शक्यता तिप्पट असते.
- जीवनशैलीचे घटक : जास्त मद्यपान करणे, आरोग्यासाठी हानीकारक जीवनशैली राखणे आणि जास्त चरबीचे सेवन करणे हे सर्व फॅटी लिव्हरला कारणीभूत ठरू शकते. ही अशी स्थिती असते ज्यामध्ये यकृतामध्ये खूप चरबी जमा होते आणि यकृताच्या पेशींची नैसर्गिक रचना विस्कळीत होते.
- सुईमुळे होणारा संसर्ग : सुईमुळे दुखापत झाल्यास किंवा संक्रमित रक्त किंवा शरीरातील द्रव यांच्या संपर्कामुळे संसर्ग होऊ शकतो.
काही प्रतिबंधात्मक उपाययोजना :
- नियमित चाचणी : यकृताचा कर्करोग आणि यकृताचे इतर गंभीर आजार prompt viral hepatitis चाचणी आणि उपचाराने टाळता येतात. यामुळे समस्यांबद्दल जाणून घेण्यास आणि चांगले आरोग्य राखण्यास मदत होते.
- आरोग्यदायी जीवनशैली : यकृताच्या समस्या रोखण्यासाठी जीवनशैलीतील बदल, वेळेत निदान आणि त्वरित वैद्यकीय सल्ला यामुळे मदत होऊ शकते.
- स्वच्छतेच्या सवयी : HAV विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी चांगली वैयक्तिक स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. स्नानगृह वापरल्यानंतर, डायपर बदलल्यानंतर आणि अन्न तयार केल्यानंतर, वाढल्यानंतर किंवा खाल्ल्यानंतर, आपले हात साबणाने आणि पाण्याने स्वच्छ धुवा.
- लसीकरण करा : हेपेटायटीस ए विरूद्ध लसीकरण हा सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. संक्रमणाचा उच्च धोका असलेल्या देशांमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांसाठी चांगला पर्याय आहे. तथापि, हेपेटायटीस लसीकरण केवळ मुलांसाठी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी नाही. तुम्हाला धोका आहे असे वाटत असल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांना लसीकरणाबाबत विचारावे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Hepatitis चे प्रकार, कारणे, लक्षणे, उपचार आणि टाळण्यासाठी टिप्स
- Mumbai : भारतातील दुसऱ्या सर्वात लहान मुलावर दुर्मिळ विकारामुळे 'बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया'; काय आहे हा विकार? जाणून घ्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )