(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai : भारतातील दुसऱ्या सर्वात लहान मुलावर दुर्मिळ विकारामुळे 'बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया'; काय आहे हा विकार? जाणून घ्या
Mumbai : बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया (Bariatric Surgery) करणारा 20 महिन्यांचा इब्राहिम खान हा भारतातील दुसरा सर्वात लहान मुलगा ठरला आहे.
Mumbai : बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया (Bariatric Surgery) करणारा 20 महिन्यांचा इब्राहिम खान (Ibrahim Khan) हा भारतातील दुसरा सर्वात लहान मुलगा ठरला आहे. 18 जुलै रोजी त्याच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सध्या तो NH SRCC चिल्ड्रन हॉस्पिटल, हाजी अली या रूग्णालयात उपचार घेत आहे. विशेष बाब म्हणजे, इब्राहिमची बहीण झोया तिलाही हाच अनुवंशिक विकार होता. झोया 10 महिन्यांची असताना तिच्यावर बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 10 महिन्यांच्या वयात बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करणारी झोयादेखील पहिली मुलगी होती.
गोवंडीत राहणाऱ्या युसूफ आणि ताज या दांपत्यांच्या मुलाला लेप्टिन रिसेप्टरची (LepR) कमतरता असल्याचे निदान झाले. हा एक ऑटोसोमल-रिसेसिव्ह एंडोक्राइन डिसऑर्डर (Autosomal-Recessive Endocrine Disorder) आहे. ज्यामुळे मुलांमध्ये फार कमी वयातच लठ्ठपणा वाढायला सुरुवात होते.
Autosomal-Recessive Endocrine Disorder म्हणजे काय?
ऑटोसोमल-रिसेसिव्ह एंडोक्राइन डिसऑर्डर (A-RED) हा विकार नेमका काय हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाने NH SRCC चिल्ड्रन हॉस्पिटलमधील बॅरिएट्रिक सर्जन डॉ. संजय बोरुडे यांच्याशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, "ऑटोसोमल-रिसेसिव्ह एंडोक्राइन डिसऑर्डर हा एक विकार आहे. यामध्ये मुलांना सतत भूक लागते. त्यांना भूकेचा अंदाज येत नाही. तसेच खाल्लेल्या अन्नाचे उर्जेत रूपांतर न होता ते अन्न चरबीत जमा होते आणि वाढत जाते. या विकाराला हायपोथालेमिक लठ्ठपणा देखील म्हणतात. नॉर्मल मुलांपेक्षा हा विकार झालेल्या मुलांचे वजन चार पटीने वाढते. त्यामुळे मुलांना चालताही येत नाही."
काय आहे बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया?
"बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया म्हणजे जास्त वजन वाढण्यावर नियंत्रण ठेवणे. यामुळे मुलांचे वजन झटपट वाढत नाही. तसेच, या शस्त्रक्रियेदरम्यान, पोटाचा वरचा भाग काढून टाकला जातो. ज्याला फंडस म्हणतात.” असे डॉ. बोरुडे म्हणाले. डॉक्टरांनी सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर, इब्राहिम दर 30 मिनिटांनी 30 मिली द्रवपदार्थ घेतो. तसेच त्याला पुढचे काही महिने द्रवपदार्थावरच ठेवण्यात आले आहे. तसेच त्याला फिजिओथेरपी देखील आवश्यक आहे. इब्राहिमच्या वाढत्या वजनामुळे तो चालायलाही शिकला नाही. बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया ही साधारण 18 ते 70 वर्षांपर्यंत केली जाते. मात्र, इब्राहिमचे वजन खूप जास्त वाढल्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच हा एक प्रकारचा आनुवंशिक आजार असल्याचेही डॉ. म्हणाले.
इब्राहिम प्रमाणेच त्याची मोठी बहिण झोया हिच्यावरही 10 महिन्यांची असताना तिच्यावर बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मुळात हा विकार फार दुर्मिळ असल्या कारणाने भारतात या विकारावर कोणतीही औषधं उपलब्ध नाहीत. तसेच, जगात यावर औषधं उपलब्ध असली तरी ती 18 वर्षांनंतर उपलब्ध आहेत. असे डॉ. संजय बोरुडे म्हणाले.
भारतात इब्राहिम आणि त्याच्या बहिणीसह तीन अशा केसेस आढळल्या आहेत. तर, जगभरात आतापर्यंत अशा 90 केसेस नोंदविण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Ganeshotsav 2022 : निर्बंध मुक्त दहीहंडी, गणेशोत्सव; मंडळ नोंदणी ते मूर्तीची उंची, सरकारच्या महत्वाच्या घोषणा एका क्लिकवर
- Maharashtra Rain : राज्यात उद्यापासून चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईसह कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात इशारा
- Chiplun Flood : चिपळूणच्या महापुराला एक वर्ष पूर्ण; गतवर्षीच्या आठवणी आजही मनात ताज्या, एका वर्षांत काय बदललं?
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )