Weight Loss: लग्न ठरलंय? झटपट वजन कमी करायचंय? एक 'असा' फॉर्म्युला, 100 टक्के फायदा मिळेल?
Weight Loss: जर तुम्ही लवकरच लग्न करणार असाल आणि तुमच्या वाढत्या वजनाची काळजी करत असाल तर थोडा ब्रेक घ्या आणि ही बातमी वाचा..
Pre Wedding Weight Loss: जर तुमचं लग्न ठरलंय, आणि अवघ्या काही दिवसांवर आहे. लग्नात तुम्हाला सुंदर आणि सुडौल दिसायचंय? लठ्ठ पोटाची काळजी करत असाल तर थोडा ब्रेक घ्या आणि ही बातमी वाचा. आज आम्ही तुमच्यासाठी एक फॉर्म्युला आणला आहे जो 100 टक्के प्रभावी ठरेल. हे केवळ पोटाची चरबी वितळण्यास मदत करत नाही तर वजन कमी करण्यास देखील मदत करेल. जाणून घ्या या फॉर्म्युलाबद्दल...
वेट लॉससाठी 12:12 फॉर्म्युला म्हणजे काय?
आज आम्ही वजन कमी करण्यासाठी '12:12 फॉर्म्युला' बद्दल बोलत आहोत, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हा एक प्रकारचा इंटरमिटंट फास्टिंग उपाय आहे. यामध्ये लोक 12:12 या प्रमाणात उपवास करतात. म्हणजेच ते12 तास उपाशी राहतात. उर्वरित 12 तास खातात. 12:12 चा उपवास पोटाची चरबी कमी करण्यास मदत करू शकतो. त्यामुळे तुमची झोप सुधारते. यासोबतच, हे सतत भूक कमी करण्यास देखील मदत करते. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार डॉ. सेठी म्हणतात, सर्वप्रथम 12:12 उपवास सुरू करा, जो तुमच्या शरीरासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. याच्या मदतीने तुम्ही जंकफूड टाळू शकता आणि शरीर निरोगी ठेवण्यास देखील मदत करू शकता. डॉक्टरांच्या मते कोणीही हा प्लॅन फॉलो करू शकतो, ज्याला त्याची पूर्ण माहिती असेल. याबाबत तुम्ही एखाद्या तज्ज्ञाचा देखील सल्ला घेऊ शकता. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या
पोटाची चरबी कमी करण्यासाठी...
पोटाची चरबी कमी करण्यासाठी अधूनमधून उपवास करणे फायदेशीर आहे, परंतु काही विशेष पेयांचा समावेश चयापचय वाढवू शकतो. डॉक्टर तुम्हाला या दरम्यान ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी, ग्रीन टी आणि ऍपल सायडर व्हिनेगर याशिवाय इतर पेये पिण्याचा सल्ला देतात. ते म्हणतात की तुमच्या उपवासाच्या वेळी फक्त ब्लॅक कॉफी, ग्रीन टी, ब्लॅक टी, पाणी, सफरचंद सायडर व्हिनेगर, लिंबू पाणी, बडीशेप किंवा तुळशीचे पाणी, आल्याचा चहा पिल्यास उत्तम ठरेल.
अधूनमधून उपवास करताना आहाराची काळजी घ्या..
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी आहार खूप महत्त्वाचा आहे. अधूनमधून उपवास करताना तज्ज्ञांनी उच्च फायबर आणि उच्च प्रथिनेयुक्त आहार घेण्याची शिफारस केली आहे. जेवताना उच्च फायबर आणि उच्च प्रथिनांवर लक्ष केंद्रित करा. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पनीर, टोफू, चणे, चिकन, अंडी, मासे यांसारख्या उच्च प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करू शकता. उच्च फायबरसाठी फळे आणि भाज्या खा.
हेही वाचा>>>
Men Health: आजकाल पुरुषांच्या स्तनांचा आकार का वाढतोय? काय आहे ही समस्या? कारण आणि उपाय जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )