Sanjay Raut Full PC : ...तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देऊ, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Sanjay Raut Full PC : ...तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देऊ, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्रामधे पालकमंत्रीपदावरून दंगल सुरू आहे रायगडच्या पालकमंत्री पदावरून रस्त्यावर आंदोलनं सुरू आहे नाशिकमधेही तेच सुरू आहे..बीडमधेही तोच प्रकार आहे हे चित्र पाहता एवढं मोठं बहुमत मिळूनही यांच्या पाय खेचण्याचा प्रकार सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळं करून दावोसला निघून गेले यावर शिंदेंची नाराजी आहे एरवी मुख्यमंत्री म्हणतात मी कठोर आहे, बेशिस्त सहन करणार नाही, मग आता स्थगिती का दिली पालकमंत्रीपदासाठी एवढा हावरटपणा का मंत्री राज्याचा असतो, ती एखाद्या जिल्ह्यासाठी नसतो पालकमंत्री पद हे केवळ त्यात्या जिल्ह्यातील आर्थिक व्यवहारांसाठी असतं नाशिकमधे कुंभमेळ्याचं बजेट मोठं आहे, त्यासाठी हाव आहे रायगडमधले उद्योग-धंद्यांमुळे तिथल्या आर्थिक व्यवहारांवर नजर आहे जर दिल्लीनं हस्तक्षेप करून पालकमंत्रीपदं बदलले असतील तर हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय की मुख्यमंत्री राज्यात शिस्त लावण्याचा प्रयत्न करतायत आणि दिल्ली रस्त्यावर दंगल करण्याची बाजू घेतायत. बदलापूरच्या एन्काऊंटरसंदर्भात हायकोर्टाने जे ताशेरे ओढले, जो निष्कर्ष न्यायालयाने लावले, पोलिसांवर गुन्हे दाखल झाले त्याला जबाबदार कोण आरोपीला शिक्षा व्हायलाच पाहिजे मात्र त्या न्यायासाठी काय दिशा आहे आरोपीला जन्मठेप, शिक्षा करणं सहज शक्य होतं मात्र खोटं एन्काऊंटर करून हत्या केली तर मग त्या हत्येसाठी पाच पोलिसांना फासावर लटकवलं तर त्याला जबाबदार कोण त्यावेळी तत्कालिन गृहमंत्री आणि पालकमंत्री यांनाच जबाबदार धरायला हवं उदय सामंतांना म्हणायचं असेल की त्यांचे १५ आमदार त्यांच्या संपर्कात आहेत