Watermelon Seeds Health Benefits : कलिंगडाच्या बियांचेही आहेत अनेक फायदे, ऐकून व्हाल चकित
Watermelon Seeds Health Benefits : आपण नेहमी कलिंगड खाल्ल्यानंतर त्याच्या बिया फेकून देतो. पण असं करण्याआधी कलिंगडाच्या बियांचे भन्नाट फायदे जाणून घ्या.
Benefits of Watermelon Seeds : कलिंगड (Watermelon) आरोग्यासाठी फार उपयुक्त आहे, हे साऱ्यांनाच माहित आहे. कलिंगडामध्ये जास्त प्रमाणात पाणी असते, त्यामुळे याची शरीर हायड्रेड ठेवण्यास मदत होते. पण कलिंगडासोबतच त्याच्या बियांमध्येही आहेत अनेक पोषकतत्वे आहेत, हे तुम्हाला माहित आहे का? आपण नेहमी कलिंगड खाल्ल्यानंतर कलिंगडाच्या बिया फेकून देतो. पण असं करण्याआधी कलिंगडाच्या बियांचे भन्नाट फायदे जाणून घ्या.
कलिंगडाच्या बिया (Watermelon seeds) अनेक पोषक तत्वांनी युक्त असतात. या बियांचे वरचे कवच थोडे कठीण असते. या बियांचे सेवन केल्याने आपल्या शरीराला खूप फायदा होतो. कसा ते जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.
कलिंगडाच्या बियांमध्ये 'ही' पौष्टिक तत्वे आढळतात
कलिंगडाच्या बियांमध्ये प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, कॅल्शियम, लोह, मॅग्नीशियम, फॉस्फरस, पोटॅशिअम, सोडिअम, झिंक, तांबे, मॅगनीज, फोलेट, फॅटी ॲसिड ही पौष्टिक तत्वे आढळतात.
कलिंगडाच्या बियांचे 'हे' फायदे (Health Benefits of Watermelon Seeds)
1. Watermelon Seeds Health Benefits : हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम (Good for Heart Health)
पोटॅशियम, मॅग्नेशियम, प्रथिने आणि कॅल्शियम समृद्ध आहार घेणे हृदयासाठी उत्तम मानला जातो. कलिंगडाच्या बिया यांचा उत्तम स्त्रोत आहे. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. या संबंध थेट हृदयाच्या आरोग्याशी आहे. यामुळे अनेक पोषक तत्वांनी युक्त कलिंगडाच्या बियाचे सेवन केल्याने हृदयाच्या समस्या दूर ठेवण्यास आणि त्यापासून तुमचे संरक्षण करण्यास मदत होऊ शकते.
2. Watermelon Seeds Health Benefits : रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते (Strengthens Immune System)
कलिंगडाच्या बिया रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील फायदेशीर ठरतात. यामुळे शरीराला रोगांपासून संरक्षण मिळते आणि त्यांच्याशी लढण्यासाठी मदत होते. युरोपियन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनच्या अहवालानुसार, मॅग्नेशियम आणि रोगप्रतिकारक शक्ती यांचा थेट संबंध आहे. शरीरात पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम असल्यास रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे काम करते. कलिंगडाच्या बिया मॅग्नेशियमने समृद्ध असतात. त्यामुळे या बियांचे सेवन रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी मदत होते
3. Watermelon Seeds Health Benefits : पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते (Helps to Improve Male Fertility)
कलिंगडाच्या बियांमध्ये असलेले झिंक हे पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते. झिंकचे सेवन केल्याने पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता वाढू शकते. अभ्यासानुसार, शरीरातील झिंकचा पुरुषांची प्रजनन क्षमतेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. कलिंगडाच्या बियांमध्ये पुरेशा प्रमाणात झिंक आढळते, त्यामुळे याचा उपयोग पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी होऊ शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )