(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Skin Care : अशाप्रकारे करा मेयोनिजचा वापर, त्वचा आणि केसांसाठी आहे उपयुक्त
Mayonnaise Skin Care Tips : तुम्ही आवडीनं जे मेयोनिज खाता ते तुमची त्वचा आणि केसांसाठीही अतिशय फायदेशीर आहे. कसं ते जाणून घ्या.
Mayonnaise Hair Care Tips : सँडविचमध्ये किंवा चपातीला मेयोनिज लावून खाणं अनेकांना आवडतं. चविष्ट मेयोनिजमुळे पदार्थाला वेगळी टेस्ट मिळते. अनेकांना एक्स्ट्रा मेयोनिज खाण्याचा मोहही आवरत नाही. पण हे मेयोनिज तुमची त्वचा (Skin) आणि केसांचं सौंदर्य (Hair) वाढवण्यात खूप फायदेशीर आहे. मेयोनिज अनेक गुणांनी भरपूर आहे. मेयोनिजमधील अंड्यामुळे यातील पोषक तत्वं वाढतात. त्यामुळे मेयोनिज त्वचेचं आणि केसांचं सौंदर्य वाढवण्यात मदत करतात. फिटनेस काँशियस लोक मेयोनिज खाण्यापासून लांब पळतात. पण तुम्ही मेयोनिज चेहऱ्यावर किंवा केसांवर लावू शकता.
चेहरा होईल मुलायम आणि तजेलदार (Mayonnaise Uses for Skin)
चेहऱ्यावर ग्लो वाढवण्यासाठी तुम्ही मेयोनिजचा वापर करु शकता. एका वाटीत दोन चमचे मेयोनिज, अर्धा चमचा मध आणि एक चमचा ऑलिव्ह ऑईल एकत्र मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे ठेवा. यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावर छान ग्लो येईल.
कोरड्या त्वचेपासून सुटका (Mayonnaise for Dry Skin)
कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवायची असेल, तर यासाठी तुम्ही मेयोनिज हा उत्तम पर्याय आहे. मेयोनिज तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चराईज करून शुष्क त्वचेची समस्या दूर करतो. प्लेन मेयोनिज घेऊन याने चेहऱ्यावर मसाज करा. यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. याचा परिणाम तुम्हाला नक्की जाणवेल.
केसांचं सौंदर्य वाढवा (Mayonnaise Benefits for Hair)
कोरड्या केसांवर मेयोनिजचा वापर केल्याने केस अतिशय मुलायम होईल. यामुळे तुमच्या सौंदर्यात भर पडेल. क्रिमी मेयोनिजमधील अंड तुमच्या केसांना उत्तम पोषण देईल. त्यामुळे केस चमकदार आणि मुलायम होतील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )