एक्स्प्लोर

Health News : गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी आणि उपचारासाठी थर्मोग्लाइड लाँच

Health News : थर्मोग्‍लाइड हे वजनाने हलके, पोर्टेबल, एफडीए-मान्‍यताकृत डिवाईस आहे, जे वेदनादायी आणि लांबलचक प्रक्रिया असलेल्‍या गर्भाशयाच्‍या ग्रीवेचा कर्करोगाच्या उपचाराला आरामदायी करु शकते

Health News : मोबाईलओडीटी या एआय-समर्थित सर्विकल स्क्रीनिंगवर लक्ष केंद्रित करणाऱ्या इस्रायली फेमटेक स्‍टार्टअपने भारतातील अग्रगण्‍य डिजिटल मेडिकल आणि हेल्‍थकेअर सोल्‍यूशन प्रदाता जेनवर्क्‍ससोबत सहयोगाने त्‍यांचे नवीन डिवाईस थर्मोग्‍लाईड लाँच केले आहे. हे वजनाने हलके, पोर्टेबल, एफडीए-मान्‍यताकृत डिवाईस आहे, जे एकाच वेळी गर्भाशयाच्‍या ग्रीवेचा कर्करोग (Ovarian Cancer) असलेल्‍या महिलांची तपासणी आणि उपचार करते. 

महिलांमध्‍ये, विशेषत: मूल होण्‍याच्‍या वयात गर्भाशयाला संसर्ग होणे सामान्‍य आहे. पण काहीच महिला पुढाकार घेऊन स्‍वत:ची तपासणी करतात. खरेतर, वैद्यकीय संशोधनांमधून निदर्शनास आले आहे की अनेक महिलांना समकालीन उपचार प्रक्रिया वेदनादायी, लांबलचक आणि कंटाळवाणी वाटते. उदाहरणार्थ, सर्व्हायकल एक्टोपियन हा एक सामान्य आजार आहे. यामुळे भरपूर स्त्राव होऊ शकतो आणि परिणामी, बऱ्याच महिलांना चिंता आणि त्रास होऊ शकतो. बीएमसी मेडिसिनमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासासह अनेक अभ्यास हे सिद्ध करतात. 

आययूसीडी (इंट्रायूटरिन कॉन्‍ट्रासेप्टिव्‍ह डिवाईस), गर्भाशयाच्या ग्रीवेचा दाह आणि एक्टोपियनचा वापर यांच्यातील दुवा देखील एका वेगळ्या अभ्यासात प्रदर्शित केला आहे. आणखी एका अभ्‍यासामधून निदर्शनास आले आहे की, गर्भाशयाच्या ग्रीवेच्या एक्टोपियनवर उपचार केल्याने गर्भाशयाच्या ग्रीवेचं कर्करोगापासून संरक्षण होऊ शकते. भारतात स्तनाच्या कर्करोगानंतर महिलांमध्ये आढळणारा हा कर्करोगाचा दुसरा सर्वात सामान्य प्रकार आहे.

बॅटरीवर चालणारा डिवाईस थर्मोग्लाइड थर्मो-कॉग्युलेशन तंत्र वापरते, जे उष्णतेचा वापर करुन उती नष्ट करते. हे क्रायोथेरपीपेक्षा वेगळे आहे. क्रायोथेरपी आणखी एक लोकप्रिय दृष्टीकोन आहे, ज्‍यामध्‍ये उती काढून टाकण्यासाठी थंड तापमानाचा वापर करतात. जर्नल ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अॅण्‍ड गायनॅकॉलॉजी रिसर्चच्या मते, थर्मो-कॉग्युलेशन क्रायोथेरपीइतकेच प्रभावी व सुरक्षित आहे आणि उच्च-दर्जाच्या ग्रीवाच्या जखमांवर उपचार करण्यासाठी सहजपणे वापरता येऊ शकते. 

थर्मोग्लाईड एक प्रभावी साधन ठरेल : डॉ. प्रिया गणेश कुमार, 

साईनिवास हेल्‍थ केअरच्‍या मेडिकल डायरेक्‍टर आणि जेनवर्क्‍सच्‍या विमेन्‍स हेल्‍थच्‍या क्लिनिकल अॅडवायजर डॉ. प्रिया गणेश कुमार म्‍हणाल्‍या, "एक्टोपियनच्या बाबतीत थर्मोग्लाईडचे चांगले परिणाम लोकांना मिळत आहेत. क्रायोथेरपीनंतर रुग्णांना कमीत-कमी तीन आठवडे पाण्यासारखा स्त्रावचा त्रास होतो आणि त्यांना ते नकोसे वाटते. मोठ्या जखमांमध्ये क्रायोथेरपी वापरणे देखील आव्हानात्मक आहे, कारण या तंत्रामध्‍ये मर्यादा आहेत. पण थर्मोग्लाईड एक प्रभावी साधन ठरु शकते." 

डॉ. प्रिया गणेश पुढे म्‍हणाल्‍या, "मोबाइलओडीटीच्‍या मते, हे डिवाईस जलदपणे, जवळपास आठ सेकंदामध्‍ये हिटिंग करत प्रक्रियेसाठी लागणारा वेळ कमी करु शकतो आणि 100 अंश सेल्सिअस तापमान कायम ठेवू शकतो, ज्‍यामुळे गर्भाशयाच्‍या ग्रीवेचा त्‍वरित उपचार होऊ शकतो. थर्मोग्‍लाईडसह मी अनेक ठिकाणी हिटेड प्रोब वापरु शकते आणि ते देखील कमी वेळेत." 

मोबाईलओडीटीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी लिओन बोस्‍टन म्‍हणाले, "थर्मोग्‍लाईड हे वैविधता, व्‍यावहारिकता आणि सुलभ वापरामुळे प्रत्‍येक स्‍त्रीरोगतज्ञासाठी आवश्‍यक साधन आहे. हा डिवाईस सोप्‍या, वेदनाविरहित, जलद प्रक्रियेसह कर्करोगपूर्व जखमा आणि गर्भाशयाच्‍या ग्रीवेचा उपचार करु शकतो. आम्‍हाला आमचे सहयोगी जेनवर्क्‍स यांच्‍या साहाय्याने भारतात थर्मोग्‍लाईड लाँच करण्‍याचा अभिमान वाटण्‍यासोबत आनंद होत आहे. भारत आमच्‍यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे."

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif Ali Khan Attack: पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
Embed widget