एक्स्प्लोर

Balloon : फुगा फुगवताना फुटला आणि श्वसननलिकेत अडकला, चिमुकल्याचा दु्र्दैवी मृत्यू

UP News : फुगा फुगवताना एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबियांनी चिमुकल्याचा उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

Child Death due to Balloon : खेळण्या-खेळण्यात चिमुकल्याचा (Child) करुण अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फुग्यामुळे (Balloon) चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) अमरोहा (Amroha) येथे घडली आहे. फुगा फुगवताना एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत (UP News) आहे. कुटुंबियांनी चिमुकल्याचा उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कुणी विचारही केला नव्हता की, फुग्यासोबत खेळताना चिमुकल्याला जीव गमवावा (Child Death While Inflating Balloon in UP) लागला.

फुग्यासोबत खेळताना चिमुकल्याचा धक्कादायक पद्धतीने मृत्यू

या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. चिमुकल्याला रुग्णालयात (Hospital) नेण्याआधीच चिमुकल्याने (Child Death News) प्राण सोडला होता. फुगा (Balloon) फुगवताना अचानक फुटला आणि याचा तुकडा चिमुकल्याच्या तोंडातून (Mouth) श्वसननलिकेत (Respiratory Tract) जाऊन अडकला. यानंतर चिमुकल्याचा श्वास गुदमरला आणि त्याला अस्वस्थ वाटू लागलं. कुटुंबियांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी लहानग्याचा रुग्णालयात दाखल केलं, पण त्याआधी चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. खेळता-खेळता चिमुकल्याचा मृत्यू होऊ शकतो, असा विचारही केला नव्हता, अशी प्रतिक्रिया नातेवाईकांनी दिली आहे.  

कुटुंबावर दु:खाचा डोंगर; नक्की घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील गजरौला येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृत बालकाचं वय 10 वर्ष (Ten Years Child Died) होते. तो इयत्ता पाचवीचा विद्यार्थी होता. गुरुवारी चिमुकला घराबाहेर इतर मुलांसोबत खेळत होता. यावेळी त्याने खेळताना तोंडाने फुगा फुगवण्यास सुरुवात केली. फुगवताना फुगा फुटला आणि त्याचा तुकडा त्याच्या तोंडात गेला. फुगा घशात अडकल्याने त्याला त्रास होऊ लागला. त्याला श्वास घेण्यास त्रास (Breathing Problem) होऊ लागला आणि त्यानंतर तो बेशुद्ध (Unconcious) होऊन जमिनीवर पडला.

त्यानंतर एकत्र खेळणाऱ्या मुलांनी ही बाब चिमुकल्याच्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर घरात एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांनी तात्काळ मुलाला घेऊन रुग्णालयात धाव घेतली. पण, तेथील डॉक्टरांनी चिमुकल्याला मृत घोषित केलं. यानंतर मृताच्या कुटुंबावर शोककळा पसरली. चिमुकल्याच्या आईला फार मोठा धक्का बसला आहे. आपला चिमुकला असा अचानक जग सोडून जाईल यावर कुटुंबीयांचा विश्वास बसत नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mumbai Crime News : अंगावर गरम चहा सांडल्याने चिमुकली जखमी, मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमधील प्रकार; वेटरवर गुन्हा दाखल

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळGulabrao Patil : पालकमंत्रिपदाबाबत Dada Bhuse, Bharat Gogawaleवर अन्याय: गुलाबराव पाटीलABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Arrest सैफचा आरोपी 'या' लेबर कँपमध्ये लपला होता, 'माझा'चा Exclusvie Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
Pandharpur Crime : चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
Dhananjay Munde: मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
Embed widget