Sleeping Position Tips : ...यासाठी पोटावर झोपू नये; जाणून घ्या याचे परिणाम
Sleeping Position Tips : तज्ज्ञांच्या मते, पोटावर झोपणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. असे केल्याने शरीराचा दाब पाठीवर आणि मणक्यावर पडतो.
Sleeping Position Tips : झोप ही प्रत्येकालाच आवडते. आणि प्रत्येकाची झोपण्याची शैली (Sleeping Position) वेगवेगळी असते. काहींना सरळ झोपायला आवडतं. तर काहींना डाव्या किंवा उजव्या बाजूला झोपायला आवडतं. काहींना पोटावर झोपायला आवडतं. मात्र, तुमच्या झोपण्याच्या स्थितीचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे का? पोटावर झोपू नका, असे तुम्हाला घरात अनेकदा सांगण्यात आले असेल. यामागेही आरोग्य हेच कारण आहे. आज आम्ही तुम्हाला पोटावर झोपण्याबाबत आरोग्य तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे ते सांगणार आहोत.
मणक्यात दाब, शरीर दुखणे :
तज्ज्ञांच्या मते, पोटावर झोपणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. असे केल्याने शरीराचा दाब पाठीवर आणि मणक्यावर पडतो. या स्थितीत झोपल्याने बहुतांश वजन शरीराच्या मध्यभागी येते. अशा परिस्थितीत, पाठीच्या कण्यातील स्थिती बदलत नाही आणि त्यावर दबाव निर्माण होतो. त्यामुळे शरीराच्या इतर भागातही दुखण्याच्या तक्रारी सुरू होतात. पोटावर झोपणं हे शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी चांगले नसते.
वेदना आणि वारंवार हातापायांना मुंग्या येणे :
पोटावर झोपल्याने शरीरात निष्क्रियता जाणवते, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना आणि मुंग्या येण्याची समस्या आहे. कधी कधी शरीर सुन्न होऊन जातंय असं वाटतं. जे लोक पोटावर झोपतात त्यांना अनेकदा मानदुखीचा त्रास होतो. त्यांना झुकण्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागते.
गर्भवती महिलांनी असे करणे टाळावे :
जर एखादी स्त्री गर्भवती असेल तर तिने पोटावर झोपणे टाळावे. अशा परिस्थितीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण गरोदरपणात स्त्री पोटावर झोपली तर त्याचा परिणाम मुलावर होतो.
पोटावर झोपण्याचे फायदे :
आतापर्यंत तुम्ही पोटावर झोपण्याचे तोटे वाचले असतील. मात्र, पोटावर झोपण्याचे काही फायदेही आहेत. त्यातील मुख्य फायदा म्हणजे जर तुम्हाला घोरण्याची सवय असेल तर पोटावर झोपल्याने तुमची ही समस्या दूर होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Yoga Asanas for Women : महिलांनो फिट राहायचंय? मग रोज ही 7 योगासने करा, काही दिवसांतच बदल जाणवेल
- Heart Health Tips : हृदयविकाराचा झटका साधारण किती वेळा येऊ शकतो? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )