एक्स्प्लोर

Anxiety and Heart Disease Symptoms Difference: एंग्झायटी आणि हृदयविकाराच्या लक्षणांमधील फरक कसा ओळखाल? जाणून घ्या A टू Z माहिती

Anxiety and Heart Disease Symptoms Difference: छातीत दुखणे, धाप लागणे, घाम येणे किंवा हृदयाचे ठोके अचानक वाढणे अशी लक्षणे जाणवली की अनेकजण घाबरून जातात.

Anxiety and Heart Disease Symptoms Difference: छातीत दुखणे, धाप लागणे, घाम येणे किंवा हृदयाचे ठोके अचानक वाढणे अशी लक्षणे जाणवली की अनेकजण घाबरून जातात. ही लक्षणे एंग्झायटी (ताण-तणाव) मुळे आहेत की हृदयविकाराची सुरुवात आहे, हे समजणे अनेकदा कठीण जाते. मात्र योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास अनावश्यक घाबराट टाळता येते आणि गरज असल्यास त्वरित उपचार मिळू शकतात. या पार्श्वभूमीवर डॉ. बिपीनचंद्र भामरे, कार्डियाक सर्जन, सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबई यांनी एंग्झायटी आणि हृदयविकाराच्या लक्षणांमधील फरक कसा ओळखायचा? याबाबत दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊयात... 

Anxiety and Heart Disease Symptoms Difference: एंग्झायटी आणि हृदयविकाराची लक्षणे का सारखी वाटतात?

  • एंग्झायटी असताना शरीरात अ‍ॅड्रेनालिनसारखे तणावजन्य हार्मोन्स वाढतात, हृदयाचे ठोके जलद होतात, रक्तदाब वाढतो, श्वासोच्छ्वास वेगाने होतो आणि छातीत अस्वस्थता जाणवू शकते.
  • हृदयविकारात मात्र हृदयाच्या स्नायूंकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे छातीत जडपणा किंवा वेदना जाणवतात आणि त्या डाव्या हातात, जबड्यात, मानेत किंवा पाठीकडे पसरू शकतात. त्यामुळे घाम येणे मळमळ आणि तीव्र अशक्तपणाही येऊ शकतो.

Anxiety and Heart Disease Symptoms Difference: फरक कसा ओळखाल?

  • एंग्झायटीची लक्षणं  ही ताणतणावाच्या वेळी वाढतात आणि शांत राहिल्यास, दिर्घ श्वास किंवा रिलॅक्सेशनने कमी देखील होतात.
  • हृदयविकाराची वेदना दडपण/सक्विझिंगसारखी असते आणि ती चालणे, जिने चढणे अशा शारीरिक हालचालींनी वाढू शकते.
  • एंग्झायटीमध्ये छातीत दुखणे बहुतेक वेळा काही तरी टोचल्यासारखे व एका ठिकाणापुरता मर्यादित असते.
  • हृदयाशी संबंधित वेदना छातीत जडपणा निर्माण करतात आणि दिर्घ श्वास, ध्यान-धारणा केल्याने त्वरित कमी होत नाहीत.
  • हृदयविकाराची लक्षणे दिर्घ काळ टिकू शकतात.

छातीत दुखणे नेमके कशामुळे आहे हे समजत नसेल, आणि तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपानाची सवय किंवा कुटुंबात हृदयविकाराचा वैद्यकीय इतिहास असेल, तर विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. हृदयविकारात वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.

Anxiety and Heart Disease Symptoms Difference: हृदय आणि मन दोन्ही निरोगी राहण्यासाठी उपाय

  • आठवड्यातून किमान ५ दिवस व्यायाम करा.
  • योग, ध्यान, श्वसनाचे व्यायाम करून ताण कमी करा.
  • संतुलित आहाराचे सेवन करा; धूम्रपान व मद्यपान टाळा.
  • छातीत दुखत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
  • नियमित आरोग्य तपासणी करून घ्या.

भारतात अंदाजे 3 ते 4 टक्के लोकसंख्या एंग्झायटी डिसऑर्डरने प्रभावित आहे, आणि ताणतणावपूर्ण जीवनशैलीमुळे ही संख्या वाढताना दिसते. एंग्झायटी आणि हृदयविकाराची लक्षणे कधी कधी सारखी वाटू शकतात. मात्र त्यातील फरक वेळीच ओळखून त्यानुसार काळजी घेतली, तर गंभीर परिणाम टाळता येतात. हृदयाच्या आरोग्याबाबत कधीही हलगर्जीपणा करू नका आणि असामान्य लक्षणं जाणवल्यास वेळेवर उपचार घ्या आणि निरोगी रहा.

भारतात दरवर्षी सुमारे 28–30 लाख लोकांचा मृत्यू हृदयविकारामुळे होतो. एकूण मृत्यूंपैकी सुमारे 28 टक्के मृत्यू हृदयविकार आणि रक्तवाहिनीसंबंधित आजारांमुळे होतात. गेल्या काही वर्षात 30 ते 50 वयोगटातील हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. बैठी जीवनशैली , जंक फूडचे वाढते सेवन , धूम्रपान, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, असे डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी म्हटले आहे.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा 

Child Health: पूर्वीपेक्षा सध्याचे पालकत्व अधिक आव्हानात्मक! घरातील तणावपूर्ण वातावरणाचा मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम? तज्ज्ञ सांगतात...

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

World Breastfeeding Week: महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
Annual Health Checkup Benefits : वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Pune Nashik Highway Accident: भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Bollywood Actor Pradeep Rawat Struggle Stroy: 'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
Embed widget