Pumpkin Side Effects : 'या' लोकांनी भोपळ्यापासून लांब राहिलेलंच बरं; नाहीतर उद्भवू शकतात आरोग्याच्या समस्या!
Pumpkin Side Effects : भोपळ्याची भाजी स्वादिष्ट आणि आरोग्यदायी असतेच, पण भोपळ्याच्या बियादेखील आरोग्यासाठी चांगल्या असतात. या बियांमध्ये अनेक पोषक घटक असतात. यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या दूर ठेवता येतात.
Pumpkin Side Effects : धकाधकीच्या जीवनशैलीमुळे (Stressful Lifestyle) आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर, योग्य आणि सकस आहार. डायबिटीज (Diabetes), हृदयविकार (Cardiovascular Disease), कॅन्सरसारखे (Cancer) गंभीर आजार टाळण्यासाठी आहारात फळं, भाजीपाल्याचा समावेश करावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात. प्रत्येक भाजीत भरपूर पोषणमूल्यं असतात. त्यामुळे भाज्यांचं सेवन आरोग्यासाठी लाभदायक ठरतं. काही भाज्यांच्या साली आणि बियादेखील आरोग्यासाठी उत्तम असतात. भोपळा हा त्यापैकीच एक.
भोपळ्याची भाजी स्वादिष्ट आणि आरोग्यदायी असतेच, पण भोपळ्याच्या बियादेखील आरोग्यासाठी चांगल्या असतात. या बियांमध्ये अनेक पोषक घटक असतात. यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या दूर ठेवता येतात. भोपळ्याच्या बिया पौष्टिक असतात. यामध्ये झिंक, आरोग्यदायी फॅट्स आणि मॅग्नेशियम असतं. या बियांचं सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते. भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे पोटदुखीची समस्या दूर होते. तसंच ब्लोटिंगचा त्रास दूर होऊन आराम मिळू शकतो. या बियांमुळे पोटाचं आरोग्य चांगलं राहू शकतं.
भोपळ्यात मोठ्या प्रमाणावर प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजं आणि अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. पण काही परिस्थितींमध्ये त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. भोपळा आरोग्यासाठी फायदेशीर असला तरीही, काही लोकांसाठी मात्र भोपळा हानिकारक ठरतो. त्यामुळे भोपळ्यापासून जेवढं लांब राहता येईल ते वढं चांगलं.
भोपळा कोणासाठी हानिकारक?
- जर तुम्ही लठ्ठपणानं त्रस्त असाल तर भोपळ्याच्या भाजीचं सेवन करू नका, कारण यामुळे तुमचं वजन आणखी वाढेल. तसेच, पचनाच्या समस्याही उद्भवतील.
- जर तुम्ही भोपळ्याच्या भाजीचं सेवन केलं तर तुम्हाला सूज येण्यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. मधुमेहाच्या रुग्णांनी याचं सेवन करू नये. यामुळे रक्तातील साखर वाढते.
- भोपळ्याची भाजी खाल्ल्यानं ॲलर्जीची समस्या वाढू शकते. त्यामुळे त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागतं. याचं सेवन केल्यानं हात आणि पायांवर लाल पूरळ आणि पूरळ येऊ शकतात.अशा परिस्थितीत तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर अशावेळी भोपळ्याची भाजी खाणं टाळावं. यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. यामुळे उलट्या होऊ शकतात.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )