Papaya For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी दररोज प्या पपईचा ज्यूस; काही दिवसांतच बर्फासारखी वितळेल पोटावरची चरबी!
Papaya For Weight Loss: ज्या लोकांना त्यांचा लठ्ठपणा कमी करायचा आहे, ते हमखास पपई खाऊ शकतात. पपई खाल्ल्यानं वजन कमी होण्यास मदत होते.
Papaya For Weight Loss : वाढलेल्या वजनाच्या (Weight Gain) समस्येनं आज प्रत्येकजण हैराण आहे. वजन कमी (Weight Loss Tips) करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात, काही जिममध्ये जाऊन व्यायाम करतात, तर काही योगा आणि डाएटसारख्या (Healthy Diet) गोष्टींचा आधार घेतात. पण, तासन्तास घाम गाळून आणि जिममध्ये मेहनत करूनही वजन काही कमी होण्याचं नाव घेत नाही. ज्या लोकांना त्यांचा लठ्ठपणा कमी करायचा आहे, ते हमखास पपई खाऊ शकतात. पपई खाल्ल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. चला जाणून घेऊयात, वजन कमी करण्यासाठी पपईचं सेवन कसं करावं आणि वजन कमी करण्याव्यतिरिक्त पपई खाण्याचे इतर कोणते फायदे आहेत?
वजन कमी करण्यासाठी पपईचे सेवन कसे करावे? (How to eat papaya for weight loss in Marathi)
पपईचा रस पिऊन वजन कमी करा (Drink Papaya Juice)
वजन कमी (Weight Loss Diet) करण्यासाठी पपईचा रस बनवा आणि त्याचं सेवन करा. पपईमध्ये असलेली जीवनसत्त्वं, खनिजं आणि अँटिऑक्सिडंट्स फॅट्स कमी करण्यास मदत करतात आणि मेटाबॉलिज्म वाढवतात. (Papaya Juice Health Benefits)
नाश्त्यात अशी पपई खा
न्याहारीमध्ये पिकलेली पपई खाल्ल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी पपईचे तुकडे करून त्यावर काळे मीठ (Black Salt) आणि ठेचलेली काळी मिरी (Black Pepper) शिंपडा आणि खा.
दह्यासोबत पपईही खा
वाढलेल्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी दह्यासोबत पपई खाऊ शकता. पपई आणि दही एकत्र खाण्यास अगदी चवदार तर आहेच, पण पचनसंस्थेसाठीही फायदेशीर ठरू शकतं. तुम्ही नाश्ता, सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळच्या नाश्तासाठी दही आणि पपई खाऊ शकता. यासाठी एक वाटी दही घ्या आणि त्यात पिकलेल्या पपईचे तुकडे तेवढेच घ्या. तुमच्या आवडीनुसार काही ड्रायफ्रुट्स घालून खा.
पपई खाण्याचे इतर फायदे
- यामध्ये आहारातील फायबर आढळून येते, जे पचनसंस्थेच्या कार्यात मदत करते.
- पपई खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडत नाही.
- मधुमेहाच्या रूग्णांसाठी देखील ते चांगले आहे.
- शरीरातील सूज कमी करते.
- पपई रक्तातील साखरेची पातळी कमी करते.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
शेंगदाणे नुसते नका खाऊ, पाण्यात भिजवून खा; आरोग्याच्या सर्वच समस्यांवर रामबाण उपाय!
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )