मुंबईच्या डॉक्टरांना मोठं यश, कॅन्सरशी दोन हात करण्यासाठी शोधली खास थेरपी
Curb Risk Of Cancer Spread : मुंबईतील 'टाटा मेमोरियल सेंटर'मधील डॉक्टरांनी याच जीवघेण्या कॅन्सरवर एक उपाय शोधल्याचा दावा केला आहे.
Doctors Find Way To Curb Risk Of Cancer Spread : कॅन्सर (Cancer) या आजाराची व्याख्या जीवघेणा आजार अशी केली तरी वावगं ठरणार नाही. जगभरातील शास्त्रज्ञ कॅन्सरवर उपाय शोधण्यासाठी (Cure For Cancer) अहोरात्र झटत असल्याचं पाहायला मिळत आहे. कॅन्सर बरा होतो (Cancer Is Cured), पण अनेकदा रुग्णाला कॅन्सर लास्ट स्टेजला गेल्यावर लक्षणं जाणवतात, अशावेळी डॉक्टरांच्या हातातही काही नसतं आणि अनेकदा रुग्णाला प्राण गमवावे लागतात. अशातच मुंबईतील 'टाटा मेमोरियल सेंटर'मधील डॉक्टरांनी याच जीवघेण्या कॅन्सरवर एक उपाय शोधल्याचा दावा केला आहे.
'टाटा मेमोरियल सेंटर' (Tata Memorial Center) मधील डॉक्टरांनी सांगितलं की, त्यांनी कर्करोगाच्या मेटास्टेसिससाठी एक विशेष थेरपी शोधली आहे. कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी न्यूट्रास्युटिकल थेरपी विकसित करण्यात आली आहे. गेली अनेक वर्ष चाललेल्या अभ्यासानंतर ही थेरपी फायदेशीर असल्याचं निष्कर्षातून समोर आलं आहे. 'टाटा मेमोरियल सेंटर'च्या दाव्यानुसार, मरणाऱ्या कर्करोगाच्या पेशी 'क्रोमोसोम फ्रॅगमेंट्स' (क्रोमॅटिन) मागे सोडतात, ज्या काहीवेळा निरोगी पेशींसोबत एकत्र होतात आणि नवीन ट्यूमर बनवतात.
न्यूट्रास्युटिकल हे अन्न किंवा अन्न उत्पादन आहे जे मूलभूत पोषणाच्या पलीकडे आरोग्य फायदे प्रदान करतं. हे बऱ्याचदा अतिरिक्त बायोएक्टिव्ह संयुगं किंवा औषधी गुणधर्मांमुळे होतं.
कीमो : रेडिओथेरपीचा धोका उघड
जरी अनेक रुग्ण कर्करोगापासून बरे झाले असले तरी, आमचा अभ्यास सध्याच्या कर्करोग उपचार पद्धतींमध्ये समाविष्ट असलेल्या संभाव्य जोखमींवर प्रकाश टाकतो, असं टाटा मेमोरियल सेंटरचं म्हणणं आहे. संशोधनाचं नेतृत्व करणारे डॉ. इंद्रनील मित्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, किमोथेरपी आणि रेडिओथेरपी प्राथमिक ट्यूमर पेशींना मारून टाकतात, त्यामुळे मरणाऱ्या कर्करोगाच्या पेशी क्रोमॅटिन सोडतात. ज्यांना CFCHP म्हणतात. जे रक्ताद्वारे शरीरातील इतरत्र निरोगी पेशींमध्ये प्रवेश करू शकतात आणि कॅन्सरसाठी कारणीभूत ठरू शकतात.
CFCHP वरील पुढील चाचण्यांमध्ये असं दिसून आलं की, तांबे आणि वनस्पती (द्राक्ष किंवा बेरी) पासून बनविलेले न्यूट्रास्युटिकल त्यांना निष्क्रिय करू शकतं आणि मेटास्टेसिसचा धोका कमी करू शकतं. पत्रकार परिषदेला टीएमसीचे माजी संचालक डॉ. राजेंद्र बडवे उपस्थित होते. टीएमसीनं औषध निर्मितीसाठी न्यूट्रास्युटिकल उत्पादक कंपनीसोबत करार केला आहे. जे केमोथेरपीसह सहायक उपचार म्हणून निर्धारित केले जाऊ शकतं.
कॅन्सर नेमरा पसरतो कसा? संशोधनातून सिद्ध
कॅन्सरची अशी प्रकरणं जिथे रुग्णाच्या शरीरातील कॅन्सरग्रस्त ट्यूमर काढून टाकण्यात आला आहे. तरिदेखील रुग्णाचा मृत्यू झाला आहे. याबाबत डॉ. मित्रा यांनी सांगितलं की, त्यांच्या टीमनं मानवी स्तनाच्या कर्करोगाच्या पेशी उंदरांमध्ये टोचल्या. डॉ मित्रा म्हणाले, आम्ही सर्वात आधी उंदरांमध्ये वाढलेल्या ट्यूमरवर उपचार केले, मेंदूचं बायोप्सी केलं आणि तिथे मानवी कर्करोगाच्या पेशींचे CFHP आढळले. शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशनचा वापर करून विविध संशोधन फेऱ्या केल्या आणि असेच परिणाम आढळले. एका गटानं ट्यूमर धारण करणाऱ्या उंदरांना न्यूट्रास्युटिकल इंजेक्शन दिलं आणि या उंदरांच्या मेंदूच्या बायोप्सीमुळे CFCHP ची निम्न पातळी दिसून आली.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )