एक्स्प्लोर

Definition of Childhood Cancer: बाल कर्करोगाचे प्रकार माहितयत? याबाबत अनेक चर्चा, गैरसमज दूर करण्यासाठी 'हे' नक्की वाचा

Childhood Cancer : बाल कर्करोगाविषयी अनेकजा गैरसमजूती पसरलेल्या दिसून येतात. मात्र त्यामागची वास्तविकता जाणून घेणं आणि चुकीच्या समजूतींना दूर करणं गरजेचं आहे.

Misunderstanding Of Childhood Cancer : कर्करोग (Cancer) हा केवळ प्रौढांमध्ये दिसून येतो, असं नाही तर हा घातक आजार लहान मुलांना देखील आपल्या विळख्यात अडकवतो. मात्र, त्यावर वेळीच उपाय केला, तर कर्करोग बराही होऊ शकतो. नवजात बाळापासून ते 15 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये कर्करोगाचा (Childhood Cancer) सर्वाधिक प्रसार पाहायला मिळतो. तळेगावातील टीजीएच-ऑनको लाईफ कॅन्सर सेंटरमधील एमबीबीएस, एमडी डॉ. सारंग वाघमारे यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

बाल कर्करोगाचे प्रकार :

  • ल्युकेमिया (Leukemia)
  • लिम्फोमा (Lymphoma)
  • पाठीचा कण्यातील गाठ
  • मूत्रपिंडाची गाठ
  • न्यूरोब्लास्टोमास (Neuroblastoma)
  • मेंदूतील गाठी
  • रेटिनोब्लास्टोमास
  • विल्म्स ट्यूमर (Wilms Tumor)
  • ऑस्टिओसारकोमा (Osteosarcoma)

बाल कर्करोगाबाबत पालकांमध्ये जागरुकतेचा अभाव असल्यानं त्याचं निदान आणि उपचार करण्यास विलंब होतो. तसेच, या कर्करोगाबाबत असलेले गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. जेणेकरुन वेळीच निदान आणि उपचार शक्य होईल

बाल कर्करोगाबाबत गैरसमज काय? 

1. गैरसमज : बाल कर्करोग बरा होऊच शकत नाही आणि मुलाचं आयुष्य वाचविता येत नाही. तसेच, मृत्यू टाळता येत नाही. 

प्रत्यक्षात बाल कर्करोगाला नैराश्यानं पाहिलं जातं, परंतु वास्तवात बहुतेक बाल कर्करोगांवर प्रभावी उपचार करता येणं शक्य आहे. उदाहरणार्थ, ल्युकेमियाचा एक प्रचलित प्रकार जिथे 4 पैकी 3 मुलं केवळ केमोथेरपीद्वारे बरी होऊ शकतात. यशस्वी पुनर्प्राप्तीसाठी वेळीच निदान आणि योग्य उपचार महत्वाचे आहेत.

2. गैरसमज : मुलांमधील कर्करोग हा फ्लू सारखा पसरतो आणि तो संसर्गजन्य असतो, तो एका मुलाकडून दुसऱ्या मुलाकडे पसरतो. 

हा सर्वात मोठा गैरसमज असून  कर्करोग हा संसर्गजन्य आजार नाही. हे एका मुलापासून दुसऱ्या मुलामध्ये पसरत नाही. कर्करोगाने ग्रस्त मुले त्यांच्या कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे व संसर्गापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क घालतात.

3. गैरसमज : जर कर्करोगातून बरे झाले तर त्यांना यापुढे काळजी घेण्याची आवश्यकता नाही

वास्तविकता बरे झाल्यानंतरही त्यांना फॉलो-अप घेणे  गरजेचे आहे. यामागचे कारण म्हणजे त्यांच्या मागील कर्करोगाच्या उपचारांमुळे दीर्घकालीन आरोग्य समस्या विकसित होण्याची अधिक शक्यता असते. म्हणून, सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

4. गैरसमज : कर्करोगानं ग्रस्त मुले सामान्य जीवन जगू शकत नाहीत

हा विधान पूरेणपणे चुकीचे असून. कर्करोगाने ग्रस्त मुलांचे त्वरीत निदान व उपचार सुरु झाल्यास ते सामान्य जीवन जगू शकतात आणि उपचारानंतर सामान्य मुलांप्रमाणे शाळेत  परत जाऊ शकतात.

बाल कर्करोगाविषयी अनेकजा गैरसमजूती पसरलेल्या दिसून येतात. मात्र त्यामागची वास्तविकता जाणून घेणं आणि चुकीच्या समजूतींना दूर करणं गरजेचं आहे.

(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Liver Cancer: लिव्हर कॅन्सर, पुरुषांमधील पाचव्या, तर स्त्रियांमध्ये नवव्या क्रमांकाचा जीवघेणा कर्करोग; लक्षणं अन् उपचार काय?

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Earphones And Ear Damage: मोठ्या आवाजात हेडफोनमध्ये म्युझिक ऐकताय? तरुणांच्या श्रवणशक्तीवर होतोय गंभीर परिणाम, वाचा तज्ञांचा सल्ला
मोठ्या आवाजात हेडफोनमध्ये म्युझिक ऐकताय? तरुणांच्या श्रवणशक्तीवर होतोय गंभीर परिणाम, वाचा तज्ञांचा सल्ला
कॅन्सरमुळे वडिलांचे झाले होते निधन, अक्षय कुमार भावुक; म्हणाला..'पन्नाशीनंतर पुरुषांनो 'ही' टेस्ट कराच'
कॅन्सरमुळे वडिलांचे झाले होते निधन, अक्षय कुमार भावुक; म्हणाला..'पन्नाशीनंतर पुरुषांनो 'ही' टेस्ट कराच'
Health Tips : सततच्या आवाजामुळे श्रवण क्षमता कमकुवत होण्याचा धोका; तज्ज्ञांनी दिला इशारा
सततच्या आवाजामुळे श्रवण क्षमता कमकुवत होण्याचा धोका; तज्ज्ञांनी दिला इशारा
Health Tips : भारतीय आहारात आढळतो ‘प्रोटीन गॅप’; जास्त कार्बोहायड्रेट आणि कमी प्रोटीनमुळे आरोग्य धोक्यात?
भारतीय आहारात आढळतो ‘प्रोटीन गॅप’; जास्त कार्बोहायड्रेट आणि कमी प्रोटीनमुळे आरोग्य धोक्यात?

व्हिडीओ

Laxman Hake on Baramati bypoll : मेंढपाळाच्या पोराने विधानसभेत का जाऊ नये? बारामती लढणारच
Akshay Kumar UNCUT | LPG चा फटका, बायकोने 2 इलेक्ट्रिक शेगड्या मागवल्या : अक्षय कुमार
Chhatrapati Sambhajinagar : रीलस्टारची क्राईम रिअॅलिटी, मोडक्या तोडक्या इंग्रजीमुळे पर्दाफाश Special Report
Eknath Shinde Meet Amit Shah : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात अमित शहांची भेट घेणार
Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
Gold Silver Price Today: युद्धाचा परिणाम; आज सोने-चांदीच्या किमतीत वाढ की घट? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
युद्धाचा परिणाम; आज सोने-चांदीच्या किमतीत वाढ की घट? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Embed widget