Mumbai News : 'प्री-डायबेटिस टू डायबेटिस', मुंबईत दोन दिवस तज्ज्ञांचं मार्गदर्शन, प्रत्येक विषयावर होणार चर्चा
Mumbai News : लाइफनेस सायन्स इन्स्टिट्यूटतर्फे ‘प्री-डायबेटिस टू डायबेटिस : द ट्रॅजेक्टरी ऑफ कन्सर्न’ ह्या विषयावर दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे.
![Mumbai News : 'प्री-डायबेटिस टू डायबेटिस', मुंबईत दोन दिवस तज्ज्ञांचं मार्गदर्शन, प्रत्येक विषयावर होणार चर्चा Mumbai News Pre-Diabetes to Diabetes 5 and 6th january expert guidance in Mumbai marathi news Mumbai News : 'प्री-डायबेटिस टू डायबेटिस', मुंबईत दोन दिवस तज्ज्ञांचं मार्गदर्शन, प्रत्येक विषयावर होणार चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/05/8bf2df310667bcb4822e2ea72e87e33e1704438380492358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai News : सध्याच्या धावपळीच्या काळात जीवनशैलीत (Lifestyle) जाणवणारा बदल आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य वेळा यामुळे मधुमेहाचा (Diabetes) धोका वाढत चालला आहे. अनेकांना तर हा त्रास कधी सुरु होतो. याची लक्षणं काय किंवा आपल्याला देखील मधुमेह झाला आहे हे वेळीच कळत नाही. असे लोक प्री डायबेटिकमध्ये (Pre-Diabetic) येतात. त्यामुळे याची जनजागृती (Awairness) होणं फार गरजेचं आहे. याच उद्देशाने मुंबईत 5 आणि 6 जानेवारी रोजी (आज आणि उद्या) होणाऱ्या परिषदेत तज्ज्ञमंडळी ‘मधुमेहपूर्व स्थिती ते मधुमेह’ ह्या विषयावर चर्चा करणार आहेत. या चर्चासत्रांत मधुमेहा संबंधित विविध विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे. तसेच, तज्ज्ञांचं मार्गदर्शनही लाभणार आहे.
लाइफनेस सायन्स इन्स्टिट्यूटतर्फे ‘प्री-डायबेटिस टू डायबेटिस : द ट्रॅजेक्टरी ऑफ कन्सर्न’ ह्या विषयावर दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील अंधेरी (पश्चिम) येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात 5 आणि 6 जानेवारी 2024 ह्या काळात ही परिषद होणार आहे.
प्री-डायबेटिस म्हणजे काय?
‘प्री-डायबेटिस' ही गंभीर आरोग्यविषयक अवस्था आहे. ह्या टप्प्यात रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढलेली असते पण टाईप 2 (Type-2) मधुमेहाचे निदान करण्याएवढी जास्त वाढलेली नसते. इम्पेअर्ड फास्टिंग ग्लुकोजद्वारे निश्चित केल्या जाणाऱ्या मधुमेहपूर्व अवस्थेचे जागतिक प्रचलन 2021 सालात 5.8% होते आणि 2045 मध्ये ते 6.5 टक्क्यांपर्यंत जाणार (414 दशलक्ष) असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आयसीएमआर-आयएनडीएबी ह्यांच्याद्वारे अलीकडेच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, भारतातील सुमारे 15.4% शहरी लोकसंख्या आणि 15.2% ग्रामीण लोकसंख्या मधुमेहपूर्व (Pre Diabetic) स्थितीत आहे.
या संदर्भात बोलताना, फ्युचर व्हर्सिटी एज्युकेशन ग्रुप आणि लाइफनेस सायन्स इन्स्टिट्यूटचे संचालक गोपाल शर्मा म्हणाले की, “मधुमेहपूर्व स्थितीच्या प्रत्येक अंगाचा विचार करणे आणि ह्या टप्प्यातील रुग्णांचा टाईप 2 मधुमेहाकडे होणारा प्रवास टाळण्यासाठी उपायांची योजना करणे ही कल्पना आणि प्राथमिक उद्दिष्ट, विश्व स्वास्थ्यम-2024 ह्या उपक्रमाअंतर्गत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरील परिषद मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यामागे आहे. या परिषदेचे वेगळेपण म्हणजे ह्यामध्ये 25 हून अधिक प्रख्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची, महत्त्वपूर्ण आणि गंभीर विषयांवर भाषणे आणि चर्चासत्रे होणार आहेत. यामध्ये एण्डोक्रायनोलॉजिस्ट, डायबेटोलॉजिस्ट (मधुमेहतज्ज्ञ), आहारतज्ज्ञ, पोषणतज्ज्ञ, जीवनशैली प्रशिक्षक आणि योग तज्ज्ञांचा समावेश आहे.”
महत्त्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)