एक्स्प्लोर
Health Tips : तुम्ही देखील कामामुळे ऑफिसमध्ये सतत Tension मध्ये असता? मग 'या' प्रकारे Stress करा दूर
Health Tips : कामाच्या वाप वाढल्यामुळे ताणतणाव अधिक वाढतो. त्याचा परिणाम केवळ कामावरच नाही तर मानसिक आरोग्यावरही होताना दिसत आहे. यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत.
![Health Tips : तुम्ही देखील कामामुळे ऑफिसमध्ये सतत Tension मध्ये असता? मग 'या' प्रकारे Stress करा दूर Mental Problems Increasing Due To Office Workload Know In Detail Health Tips News Marathi Health Tips : तुम्ही देखील कामामुळे ऑफिसमध्ये सतत Tension मध्ये असता? मग 'या' प्रकारे Stress करा दूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/23/53a2aca36fb027c0bb3072cf4ef488301690109894207766_original.webp?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Health Tips
Mental Health : कामाचा वाढता ताण मानसिक तणाव वाढवण्याचे काम करत आहे. कामाच्या नादात अनेक वेळा आपण स्वतःला कसलाच वेळ देत नाही. त्यामुळे कामेही व्यवस्थित होत नाहीत. त्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावरही दिसून येतो. मानसशास्त्रज्ञांच्या मते, आपल्या वाढीकरता मानसिक स्वास्थ्य चांगले असणे गरजेचे आहे. यामुळे, अपराधीपणा, चिंता, स्वाभिमान गमावणे आणि स्वतःबद्दल नाराजी असे प्रकार घडत नाहीत. अशा परिस्थितीत त्यातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी जीवनात काही गोष्टी नियमित करणे गरजेचे आहे. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी...
झोपेच्या बाबतीत तडजोड करु नका
दिवसभर काम केल्यानंतर झोपही भरपूर घेणे गरजेचे आहे. तुमच्या मानसिक आरोग्यासह एकूण आरोग्यासाठी हे महत्त्वाचे आहे. झोप आणि मानसिक आरोग्य यांचा एकमेकांशी संबंध आहे. झोप पूर्ण झाली नाही तर मूड स्विंग, राग, दुःख यासारख्या समस्या उद्भवू लागतात. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोलच्या मते, 7 तासांपेक्षा कमी झोप मेंदूच्या आरोग्यासाठी अजिबात चांगली नाही. म्हणूनच पूर्ण झोप घेणे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या गरजेचे आहे. झोपण्यासाठी आणि उठण्यासाठी योग्य वेळ ठरवा.
नियमित व्यायाम करा
घर असो किंवा ऑफिस कुठेही योग्य व्यायामासाठी वेळ काढा. सतत काम केल्याने पाठ, खांदे, कंबर आणि मानेवर परिणाम होतो. अशा स्थितीत व्यायामाशी मैत्री केल्यास शरीराला वेदनांपासून आराम मिळतो. तुम्ही साध्या हालचालींद्वारे शरीराला रिलॅक्स करू शकता. तासभर काम करत बसल्यानंतर थोडा वेळ चालत जा.
फोन वापरणे कमी करा
दिवसभर फोनमध्ये मग्न राहणेही मानसिक समस्या वाढवण्याचे काम करते. म्हणूनच केवळ अत्यंत महत्त्वाचे कॉल स्वीकारा. रात्री झोपण्यापूर्वी फोन वापरल्यास त्याचा परिणाम थेट झोपेवर होतो. जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर फोनकडे बघायला सुरुवात केली तर त्याचा परिणाम आपल्या मानसिक स्वास्थ्यावर होतो.
जास्त काम करणं टाळा
जर तुम्हाला जास्त ओझे वाटत असेल तर कामाचा ताण टाळण्याचा प्रयत्न करा. मानसिक थकवा असल्याने कामावर लक्ष केंद्रित करता येणार नाही. अशा परिस्थितीत स्वत:ची काळजी घेणे आवश्यक होते. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी व्यक्तीने नाही म्हणायलाही शिकले पाहिजे. काम करताना थकल्यासारखे वाटत असल्यास, इतर जास्तीचे काम हातात घेऊ नका आणि थोडा वेळ बरे वाटण्याकरता विश्रांती घ्या.
मन प्रसन्न ठेवण्यासाठी नियमित विश्रांती आवश्यक
जे लोक कामातून ब्रेक घेतात आणि स्वत:साठी वेळ देतात त्यांचे मानसिक आरोग्य कायमच चांगले राहते आणि डोक्यात नवीन कल्पना येतात. म्हणूनच काही वेळ काम केल्यानंतर कॉफी ब्रेक आवश्यक आहे. सहकाऱ्यांसोबत गप्पा मारण्यात थोडा वेळ घालवा. कम्युनिकेशन गॅप संपल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.
इतर महत्वाच्या बातम्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)