एक्स्प्लोर

FIR Against Shreyas Talpade: अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक

FIR Against Shreyas Talpade: बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोकनाथ यांच्याविरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण एका कंपनीच्या प्रमोशनशी संबंधित आहे जी एका सोसायटीतील 50 लाखांहून अधिक लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन पळून गेली.

FIR Registered Against Shreyas Talpade, Alok Nath: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि आलोकनाथ (Alok Nath) यांच्याविरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण इंदूरमध्ये नोंदणीकृत असलेल्या सोसायटीतील 50 लाखांहून अधिक लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन पळून गेलेल्या कंपनीच्या प्रमोशनशी संबंधित आहे. हा एफआयआर हरियाणातील सोनीपतमध्ये (Haryana Sonipat) नोंदवण्यात आला आहे.

श्रेयस तळपदे (Marathi Actor Shreyas Talpade) आणि आलोकनाथ यांच्याविरुद्ध गुंतवणुकीचं आवाहन करत कंपनीची जाहीरात केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या कंपनीच्या कार्यक्रमात सोनू सूद देखील प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. 

सुरुवातीला कंपनीनं काही लोकांना पैसे दिले, पण नंतर... 

पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, या कंपनीनं 6 वर्षांपूर्वी लोकांकडून पैसे वसूल केले. कंपनीत फिक्स्ड डिपॉझिट (FD) किंवा इतर मार्गांनी गुंतवणूक केल्यास लोकांना मोठ्या परताव्याचं आश्वासन देण्यात आलं. एवढंच नाही तर, लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी महागड्या आणि मोठ्या हॉटेल्समध्ये सेमिनार आयोजित केले गेले आणि प्रोत्साहनांच्या नावाखाली बहु-स्तरीय मार्केटिंगच्या धर्तीवर एजंट तयार केले गेले. सुरुवातीला कंपनीनं काही लोकांना पैसे दिले, पण जेव्हा कोट्यवधी रुपये जमा झाले, तेव्हा प्रकरण वेगळ्याच वळणावर गेलं, असं सांगितलं जात आहे. आता कंपनी पैसे देण्यास कानकूस करत होती आणि जेव्हा लोकांनी पैसे मागू लागले, तेव्हा कंपनीचे अधिकारी त्यांचे मोबाईल बंद करू लागले.

श्रेयस तळपदे, आलोकनाथ यांच्याव्यतिरिक्त एकूण 11 जणांची नावं

कंपनीनं 2023 मध्ये आपले खरे रंग दाखवले. मोठमोठे दावे करून आणि आमिषं दाखवून अनेक वर्षे आपला खरा हेतू लपवला आणि जेव्हा हळूहळू लोकांनी कंपनीच्या सदस्यांवर फसवणुकीचे आरोप करायला सुरुवात केली, तेव्हा कंपनीच्या मालकांनी त्यांच्या एजंट आणि गुंतवणूकदारांशी असलेले सर्व संबंध तोडले. जेव्हा लोक कार्यालयात गेले आणि गोंधळ घालू लागले, तेव्हा त्यांना तिथेही कुलूप लावलं. सर्व अधिकारी आणि कर्मचारी लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन पळून गेले. एजंट्सद्वारे चालवली जाणारी 250 हून अधिक सुविधा केंद्र होती आणि वरिष्ठ अधिकारी फक्त ऑनलाईन पद्धतीनं काम करत होते. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये तळपदे आणि आलोकनाथ यांच्याव्यतिरिक्त एकूण 11 जणांची नावं आहेत.

25 जानेवारीला कोर्टात सुनावणी 

या मार्केटिंगमध्ये जर एखाद्या एजंटनं जास्त लोकांना जोडलं तर, त्याला बक्षिस म्हणून ट्रॉफी दिली जायची. या कंपनीला प्रमोट करण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिची श्रेयस तळपदेलाही हायर करण्यात आलं होतं. असं सांगितलं जात आहे की, काही इन्वेस्टर्डनी या प्रकरणात पंजाब आमइ हरियाणा हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आता या प्रकरणात 25 जानेवारीला कोर्टात सुनावणी होणार आहे. ज्यामध्ये सोसायटीच्या अधिकाऱ्यांना जबाब द्यावा लागणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Salman Khan Wedding Proposal To Monalisa: 'व्हायरल गर्ल'ला सलमान खानचं लग्नाचं प्रपोजल? महाकुंभ मेळ्यातली सोनेरी डोळ्यांची मोनालिसा भाईजानची नवरी?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Matka King: सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट, भावुक होत म्हणाला, माझ्या आयुष्यातली पहिली वेब सिरीज...
सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट, भावुक होत म्हणाला, माझ्या आयुष्यातली पहिली वेब सिरीज...
Bigg Boss Marathi Season 6: बिग बॉस विजेत्याला ट्रॉफीसह मिळणार मोठं बक्षीस; 'इतक्या' लाखांचा धनादेश, Voting Lines कधीपर्यंत सुरू?
बिग बॉस विजेत्याला ट्रॉफीसह मिळणार मोठं बक्षीस; 'इतक्या' लाखांचा धनादेश, Voting Lines कधीपर्यंत सुरू?
Patralekha: आई झाल्यानंतर अभिनेत्रीचं वाढलं वजन, बॉडी शेमिंगमुळे ट्रोल; Actress ने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली..
आई झाल्यानंतर अभिनेत्रीचं वाढलं वजन, बॉडी शेमिंगमुळे ट्रोल; Actress ने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली..
Actress Divorce: अभिनेत्री हंसिकानं 4 वर्षांच्या संसाराला दिला पूर्णविराम; काडीमोड घेण्यामागचं कारण काय? म्हणाली, 'मला पश्चाताप...'
अभिनेत्री हंसिकानं 4 वर्षांच्या संसाराला दिला पूर्णविराम; काडीमोड घेण्यामागचं कारण काय? म्हणाली, 'मला पश्चाताप...'

व्हिडीओ

Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Amit Shah : महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा, पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Embed widget