एक्स्प्लोर

Sharad Pawar : खरं म्हणलं तर हे काय कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत, अमित शाह कोल्हापूरला शिकले की आणखी कुठं माहिती नाही : शरद पवार

Sharad Pawar : शरद पवार यांनी अमित शाह यांचा बोलण्याचा टोन अतिटोकाचा असल्याचं म्हटलं याशिवाय ते काय कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत, असंही ते म्हणाले.

कोल्हापूर :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन्ही शिवसेनेचे मेळावे, अमित शाह यांच्याकडून होणारी टीका, आगामी निवडणुका, उदय सामंत यांचे आमदार फुटण्याचे दावे, दावोसमधील गुंतवणूक याबाबत भाष्य केलं. यावेळी त्यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.  अमित शाह आणि त्यांचा बोलण्याचा टोन अतिटोकाचा आहे असं शरद पवार म्हणाले. 

बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करण्यासाठी दोघांनी कार्यक्रम घेतले. बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करण्याचा अधिकार आपला आहे असं दोघांनाही वाटतं आणि त्याची प्रचिती आपण पाहिली. पण लोकांची उपस्थिती पाहिली तर उद्धव ठाकरेंच्या सभेला अधिक होती, असं निरिक्षणावरुन दिसतं, असं शरद पवार म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी याच्या अगोदर मतं मांडलं होतं. दोन दिवसांपूर्वी ते माझ्याकडे आले होते, सविस्तर चर्चा झाली. काल त्यांनी जे काय सांगितलं तसं त्यांचं मत आहे, मात्र त्यासाठी टोकाची भूमिका घेतली जाईल, असं वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले.

अमित शाह यांच्यावर टीका आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत ठाकरेंनी मौन बाळगलं असं पाहायला मिळालं असं विचारलं असता शरद पवार यांनी तसं वाटत नसल्याचं म्हटलं. अमित शाह सातत्यानं हल्ली जे काही बोलतात त्याची नोंद महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेतृत्त्वानं घेतलेली आहे. अमित शाह आणि त्यांचा बोलण्याचा टोन अतिटोकाचा आहे. देशाचा गृहमंत्री अधिक तारतम्य ठेवून भाष्य करेल, अशी अपेक्षा असते. त्याची प्रचिती तिथून काही येत नाही. खरं म्हणलं तर हे काय कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत. अमित शाह हे कोल्हापूरला शिकले की कुठं शिकले मला माहिती नाही, असं शरद पवार म्हणाले. 

उदय सामंतांचं स्टेटमेंट दावोसमधील पाहिलं, भांडवली गुंतवणूक आणण्यासाठी दावोसला गेले होते की लोक  फोडायला गेले होते ते माहिती नाही. दावोसमधून त्यांनी जी काही विधान केली ती मुख्यमंत्र्यांचा दावोसचा उद्देश होता त्याच्या सुसंगत नव्हती. ते सांगत असतील तर पाहूया, असं शरद पवार यांनी म्हटलं.  

मी काही फोटो पाहिले, ते लोक ठाकरेंची सेना सोडतील असं वाटत नाही. काही माणसं अशी आहेत की  ते पक्ष आणि बाळासाहेबांची विचारधारा अजिबात सोडणार नाहीत, असं शरद पवार म्हणाले.  

दावोसला मी देखील मुख्यमंत्री म्हणून गेलो होतो. काल जे करार झाले त्यात भारत फोर्जशी करार झाला, पुणे, कराडला त्यांचे कारखाने आहेत. जिंदाल हे स्टीलच्या फॅक्टरीत महाराष्ट्रात रत्नागिरी,नाशिक जिल्ह्यात आहेत. दावोसमधून हे जाहीर केलं, याचा अर्थ आहे ज्यांनी गुंतवणूक करायचं ठरवलंय त्या सगळ्यांना तिथून महाराष्ट्रात आणला असा देखावा केल्याचं दिसतं. आपण या हॉटेलमध्ये बसलेत, त्यांचे बंधू यांनी दावोसला करार केला हे माझ्या वाचनात आलंय, असं शरद पवार म्हणाले. फसवणूक असं नाही, नवीन उद्योग करत असतील तर हरकत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं.

इतर बातम्या :

Bapu Andhale Case : वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर! महादेव गित्तेंवर हल्ला करण्यात हात, बापू आंधळे प्रकरणातील 'तो' व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून शेअर

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची सगळ्यांचीच इच्छा, जयंत पाटलांच्या मनात योग्य विचार येतील, मंत्री नितेश राणेंचं सूचक वक्तव्य 
मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची सगळ्यांचीच इच्छा, जयंत पाटलांच्या मनात योग्य विचार येतील, मंत्री नितेश राणेंचं सूचक वक्तव्य 
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget