Men Health: पुरुषांनो...तुमच्यातील व्हिटॅमिन्सची कमतरता 'अशी' दूर करा, अन्यथा शुक्राणूंवर होईल परिणाम
Men Health: पुरुषांमधील व्हिटॅमिनची कमतरता दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. शुक्राणूंच्या कार्यामध्ये बिघाड निर्माण करू शकते. जाणून घ्या
Men Health: पुरुषांमधील व्हिटॅमिनच्या (Vitamins) कमतरतेकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. याचा संपूर्ण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. ताणतणाव, फास्ट फूडचे सेवन आणि सूर्यप्रकाशाचा अभाव तसेच बैठ्या जीवनशैलीमुळे जीवनसत्त्वे डी, बी12 आणि मॅग्नेशियमची कमतरता निर्माण होते. हे पोषक घटक केवळ ऊर्जा पातळी राखण्यासाठी आवश्यक नाहीत, तर ते हार्मोन्सच्या संतुलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉनची पातळी आणि मूड डिसऑर्डर यांसारख्या आरोग्यविषयक समस्यांबद्दल जागरूकता वाढवून व्हिटॅमिनची कमतरता दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. मुंबईतील नोव्हा आयव्हीएफ हॉस्पीटलच्या प्रजनन सल्लागार डॉ सौम्या शेट्टी यांनी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिलीय.
व्हिटॅमिन्सची कमतरता आणि पुरुषांच्या प्रजनन आरोग्यावर होणारा परिणाम...
व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे पुरुषांच्या प्रजनन आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, व्हिटॅमिन डी केवळ हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक नाही तर ते टेस्टोस्टेरॉन उत्पादनातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
कमी पातळीमुळे टेस्टोस्टेरॉन कमी होऊ शकते, ज्यामुळे कामवासना आणि प्रजनन क्षमता प्रभावित होते.
आहारात आवश्यक पोषक तत्वांचा समावेश करताना एखाद्याला तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कोणतेही सप्लिमेंट घ्यावे.
तुमच्या आहारात व्हिटॅमिनयुक्त पदार्थांचा समावेश करणे हे प्रजनन आरोग्यासाठी गेम चेंजर ठरू शकते.
लक्षात ठेवा, बदाम आणि एवोकॅडोसारखे व्हिटॅमिन ई असलेले पदार्थ पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता वाढवतात.
फळे आणि भाज्यांमध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी आणि ए सारख्या अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करतात. याच्या कमतरतेमुळे पुरुषांच्या शुक्राणूंचे देखील नुकसान होऊ शकते.
व्हिटॅमिन सी आणि ई सारखे जीवनसत्त्व शरीरास मिळणे आवश्यक असते. काजू, बेरी खाणे हा केवळ तुमचा आहारच वाढवत नाही तर प्रजनन आरोग्य देखील सुधारते.
व्हिटॅमिन डी केवळ हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक नाही, तर टेस्टोस्टेरॉनच्या उत्पादनात देखील मदत करते, याच्या कमतरतेमुळे कामवासना आणि शुक्राणूंच्या गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम होतो.
सुरमई, पापलेट सारख्या माशांची आहारात निवड करणे, दुग्धजन्य पदार्थ तुमच्या व्हिटॅमिन डीची पातळी वाढवू शकतात. तुमच्या प्रजनन आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगा आणि व्हिटॅमिनयुक्त आहाराचे सेवन करा.
हेही वाचा>>>
Men Health: पुरुषांनो.. शुक्राणूंची संख्या झपाट्याने वाढेल, 'ही' डाळ अत्यंत फायदेशीर, मिळतील 6 जबरदस्त फायदे
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )