(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Men Health: पुरुषांनो.. शुक्राणूंची संख्या झपाट्याने वाढेल, 'ही' डाळ अत्यंत फायदेशीर, मिळतील 6 जबरदस्त फायदे
Men Health: तुम्ही सर्व प्रकारच्या डाळी खात असाल, परंतु अशी एक डाळ आहे, जी पुरुषांसाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते, फायदे जाणून आश्चर्यचकित व्हाल.
Men Health: निरोगी आरोग्यासाठी अन्न अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्यामध्ये वरण-भात, भाजी-पोळी असे पदार्थ आपण खातो. कडधान्ये आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. त्यात भरपूर प्रथिने आणि अनेक पोषक घटक असतात. तुम्ही सर्व प्रकारच्या डाळी खात असाल, परंतु अशी एक डाळ आहे, ज्याचे फायदे तुम्हाला कदाचित माहित नसतील, ही डाळ पुरुषांसाठी खूप फायदेशीर मानली जाते आणि याशिवाय याचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत.
पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढवणारी 'ही' डाळ
विविध आजार तसेच शारिरीक समस्यांचं कारण हे खाण्यापिण्याच्या सवयी आणि खराब जीवनशैली मानले जाते. तुम्हालाही शारीरिक दुर्बलतेचा त्रास होत असेल, तर हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की जोपर्यंत आहार चांगला नसेल, तोपर्यंत अशा समस्या होतच राहतील. त्यामुळे आहारात अनेक गोष्टींचा समावेश करणे खूप गरजेचे आहे, त्यातील एक म्हणजे मसूर डाळ, ज्याचे अनेक फायदे आहेत. मसूर डाळीला लाल मसूर असेही म्हणतात. ही डाळ पुरुषांसाठी खूप फायदेशीर मानली जाते. वास्तविक, पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होण्याची समस्या वेगाने वाढली आहे. काही लोक असे आहेत जे स्पर्म काउंट वाढवण्यासाठी महागडी आणि वेगवेगळ्या प्रकारची औषधे वापरतात, पण तरीही फायदा होत नाही. लाल मसूर हा ऊर्जेचा चांगला स्रोत आहे. त्यात सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात आणि त्यासोबत प्रीबायोटिक कार्बोहायड्रेट्स जे पचायला सोपे असतात.
View this post on Instagram
मसूरमध्ये आढळणारे घटक
एक कप मसूरमध्ये 230 कॅलरीज, 15 ग्रॅम आहारातील फायबर आणि सुमारे 17 ग्रॅम प्रथिने असतात. हे शाकाहारी लोकांसाठी एक आदर्श पर्याय आहे आणि लोह आणि प्रथिने समृद्ध आहे. वेगवेगळ्या चवीमुळे आणि आहाराशी संबंधित फायद्यांमुळे त्याचा संतुलित आहारात समावेश करावा.
View this post on Instagram
मसूर डाळीचे फायदे
प्रथिने- मसूर डाळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण चांगले असते, जे स्नायूंच्या वाढीस मदत करते.
जीवनसत्त्वे आणि खनिजे- यामध्ये फोलेट, लोह आणि मॅग्नेशियम सारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जी शरीराच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.
हृदयाचे आरोग्य- मसूरमध्ये आढळणारे फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स हृदयाच्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.
वजन- ही मसूर वजन कमी करण्यास मदत करू शकते, कारण त्यात चरबी कमी आणि फायबर जास्त असते.
मधुमेह नियंत्रण- मसूर डाळ मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते, कारण त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे.
कॅन्सरपासून बचाव- यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट कॅन्सरसारख्या आजाराशी लढण्यास मदत करतात.
हेही वाचा>>>
Men Health: आश्चर्यच...'साडी कॅन्सरचा' केवळ महिलांनाच नाही, तर पुरुषांनाही धोका? कसं शक्य आहे? डॉक्टर म्हणतात...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )